आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एक थक्क करणारी घटना घडली आहे. येथील एका भाजीपाला विक्रेत्याच्या बँक खात्यात एक-दोन नव्हे तर तब्बल 172.81 कोटींची रोकड जमा असल्याची बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी इन्कम टॅक्स विभागाची नोटीस मिळाल्यानंतर या विक्रेत्याच्या पायाखालची वाळूच सरकली. विनोद रस्तोगी नामक हा भाजी विक्रेता म्हणाला - कुणीतरी माझ्या दस्तऐवजाचा चुकीचा वापर करून खाते उघडले. एवढे पैसे कसे आले ते मला माहिती नाही.
यूनियन बँकेच्या खात्यात 172.81 कोटी
गहमरच्या मैगर राव पट्टी येथील भाजी विक्रेता विनोद रस्तीला वाराणसीच्या इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनुसार, यूनियन बँकेतील त्यांच्या खात्यात तब्बल 172.81 कोटींची रक्कम जमा आहे. या पैशांचा कर त्यांनी भरला नाही. नोटीस मिळाल्यानंतर विनोद रस्तोगी इन्कम टॅक्स कार्यालयात गेले. त्यांनी या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांना या नोटीसीत नमूद असणारे खाते आपण उघडलेच नसल्याचे समजले. या प्रकरणी त्यांनी आपल्या डॉक्यूमेंट्सचा कुणीतरी गैरवापर केल्याचा आरोप केला.
पैशांच्या सोर्सची विचारणा
दुसरीकडे, इन्कम टॅक्स विभागाने रस्तोगी यांना वस्तुस्थिती तपासून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. गत 26 फेब्रुवारी रोजी रस्तोगी यांना इन्कम टॅक्स विभागाची नोटीस मिळाली. त्यात हे पैसे कुठून आले व त्यांचा सोर्स काय अशी विचारणा करण्यात आली होती. ही नोटीस मिळाल्यानंतर विनोद रस्तोगी यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. तेथून त्यांना सायबर सेलला पाठवण्यात आले. सायबर सेलने त्यांच्याकडून काही कागदपत्रे मागवली. त्यात रस्तोगी यांना 6 महिन्यांपूर्वीही इन्कम टॅक्सची अशीच एक नोटीस मिळाल्याचे निष्पन्न झाले.
रस्तोगी गाव सोडून गेले पळून
सायबर सेलचे प्रभारी वैभव मिश्रा यांच्या माहितीनुसार, वैभव रस्तोगी यांच्या कार्यालयात आले होते. आयकर विभागाची नोटीस दाखवण्यासह त्यांनी संपूर्ण घटनाक्रम आम्हाला सांगितला. त्यांना या प्रकरणी काही दस्तऐवज सादर करण्यास सांगण्यात आले आहे. रस्तोगी यांना यापूर्वीही एक नोटीस मिळाली होती. पण त्यांनी ती बाब पोलिसांना सांगितली नव्हती. दरम्यान, या प्रकरणामुळे घाबरून रस्तोगी गाव सोडून कुठेतरी निघून गेलेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.