आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यसभा खासदार गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ आज पूर्ण होत आहे. त्यांच्यासोबत शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त होत आहेत. यावेळी गुलाम नबी आझाद यांना निरोप देण्यासाठी अनेक नेत्यांनी त्यांच्याबद्दल असलेल्या मैत्रीच्या नात्याविषयी भाष्य केले. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुलाम नबी आझाद यांच्याबद्दलचा एक जुना किस्सा सांगितला.
यावेळी पवार म्हणाले की, 'गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभा, लोकसभेतही खासदार म्हणून काम पाहिले. त्यांनी मंत्री म्हणून अनेक खात्याचा कारभार पाहिला. जवळजवळ सर्व समित्यांवर काम करणारा एकमेव नेता म्हणूनही आझाद यांच्याकडे पाहिले जाते. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी देशहितासाठी नेहमीच महत्त्व दिले आहे. देशासाठी त्यांचे योगदान मोठे आहे.'
यावेळी शरद पवार यांनी एक किस्सा सांगितला. पवार म्हणाले की, 'गुलाम नबी आझाद हे जम्मू-काश्मीरमधून येतात. पण, 1984 च्या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रातील वाशिममधून निवडणूक लढवायचे ठरवले होते. वाशिम सारख्या मागास भागातून निवडणूक लढवण्याची त्याकाळात कोणीच हिंमत करत नव्हते. पण, आझाद यांनी ही हिंमत दाखवली आणि त्यांनी निवडणूक लढली. त्यावेळी मी विरोधी पक्षात असल्यामुळे गुलाम नबी यांना पाडायचे खूप प्रयत्न केले. आमच्या प्रचंड प्रयत्नानंतरही आझाद यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला', असे पवार म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.