आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ghulam Nabi Azad And Kapil Sibal Should Join BJP; We Are Ready For The Welcome, Ramdas Athawale

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस नेत्यांना सल्ला:गुलाम नबी आझाद अन् कपिल सिब्बल यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा; आम्ही स्वागतासाठी तयार, 'या' केंद्रीय मंत्र्याचा सल्ला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राहुल गांधी त्यांच्याच पक्षातल्या कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांवर आरोप करत असतील, तर त्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा

काँग्रेस अध्यक्षपदावरुन पक्षात मोठा वाद असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान बैठकीमध्ये राहुल गांधींनी काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्यावर भाजपसोबत 'मिलीभगत' असल्याचा आरोप लावला असल्याचे बोलले जात होते. आता यावरुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले आठवले?
रामदास आठवले म्हणाले की, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी त्यांच्याच पक्षातल्या कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांवर आरोप करत असतील, तर त्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. आम्ही त्यांच्या स्वागताला तयार तयार असल्याचंही ते म्हणाले. तसेच भाजप पुढील अनेक वर्षे सत्तेत राहणार आहे. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सिब्बल आणि आझाद यांच्यावर भाजपशी हातमिळवणी केल्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे त्या नेत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासारखं पाऊल उचलायला हवं, असा सल्ला आठवलेंनी सिब्बल आणि आझाद यांना दिलाय.

राहुल गांधींनी का केले होते आरोप?
काँग्रेसमध्ये सध्या अध्यक्षपदावरुन वाद सुरू आहे. याच कारणामुळे गेल्या आठवड्यात काँग्रेसची एक बैठक झाली. त्या बैठकीपूर्वी काँग्रेसच्या देशातल्या 23 मोठ्या नेत्यांनी पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष देण्याची मागणी करणारं पत्र पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींना पाठवले होते. हे पत्र सोनिया गांधी रुग्णालयात असतानाच का पाढवलं असं म्हणत राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली होती.

हे पत्र पाठवणाऱ्या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांच्या नावांचा समावेश होता. पत्र लिहिणाऱ्या नेत्यांनी भाजपशी 'मिलीभगत' असल्याचा आरोप राहुल यांनी केला असल्याचे बोलले जात होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर सिब्बल यांनी कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली होती. तर गुलाम नबी आझाद यांनी हे सिद्ध झाले तर राजीनामा देईल असे म्हटले होते.