आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद काढणार नवा पक्ष:म्हणाले - झेंडा व नाव काश्मिरी ठरवतील; आमची बदनामी करणाऱ्यांची मर्यादा केवळ ट्विटपर्यंत, काँग्रेसला टोला

जम्मू25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज गुलाम नबी आझाद यांनी जम्मूच्या सैनिक कॉलनीत एक रॅली काढली. काँग्रेस सोडल्यानंतर ही त्यांची पहिलीच सभा होती. त्यात ते म्हणाले की, "आपल्या पक्षाचा झेंडा असा असेल ज्याला देशातील प्रत्येक धर्माचा नागरिक स्वीकार करेल. पक्षाचा नाव आणि झेंडा ही काश्मीरमधील जनता ठरवेल"

पुढे काँग्रेसचे नाव घेता आझाद म्हणाले की, माझ्या नव्या पक्षाने त्यांच्यात खळबळ माजली आहे. मात्र, मी कोणाचे वाईट करणार नाही.

आझादांच्या पार्टीचे 3 अजेंडे
1. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा द्या.
2. बाहेरील व्यक्ती भूखंड खरेदी करणार नाही.
3. केवळ जम्मू-काश्मीरच्या लोकांना नोकरी मिळायला हवी.

काय म्हणाले आझाद

आतापर्यंत मी नव्या पक्षाची घोषणा केलेली नाही. काश्मीरची जनता पक्षाचा नाव आणि झेंडा ठरवतील. मी माझ्या पक्षाला 'हिंदुस्तानी' असे नाव देणार त्याला प्रत्येक व्यक्ती समजू शकेल. काँग्रेसला आम्ही आपल्या रक्ताने-घामाने बनवले. काँग्रेस कॉम्प्यूटर आणि ट्विटरने तयार झालेली नाही. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांची पोहोच फक्त कॉम्प्यूटर आणि ट्विटरपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळे काँग्रेस जमिनीवर दिसत नाही. ते लोक डिबेटमध्ये आनंदी राहतात. आम्ही जेष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांसोबत आहेत, असे आझाद म्हणाले.

जम्मूचे 64 नेते काँग्रेसमध्ये

26 ऑगस्ट रोजी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्षांसह आणखी चार जणांनीही काँग्रेसला रामराम ठोकला. त्या व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री ताराचंद, माजी मंत्री माजिद वानी आणि मनोहर लाल शर्मा यांनी देखील काँग्रेसला राजीनामा दिला. एकूण 64 नेते मंडळी 4 सप्टेंबरला म्हणजेच आज आझाद यांच्या नव्या पक्षात प्रवेश करतील.

भाजपात फायदा नाही

काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर आझाद हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत्या. मात्र त्यांनी भाजपात प्रवेश करणार नसल्याचे म्हटले आहे. भाजपात जावून काही फायदा नसल्याचे ते म्हटले होते. आझाद यांच्याकडे बीजेपी किंवा नॅशनल कॉन्फ्रेंस व पीडीपी या पक्षासोबत युती करण्याची पर्याय आहे.

डीएनए विधानावर दिलेले उत्तर

काँग्रेसचे अनेक नेते आता उघडपणे गुलाम नबी यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत. अलीकडेच काँग्रेसने आझाद यांच्या डीएनएवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षाच्या एका नेत्याने म्हटले होते की, आझाद यांचा डीएनए बदलून मोदी झाला आहे. आता त्यांच्या डीएनएवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नावर आझाद यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. जर तुम्ही इतर राजकीय पक्षांच्या लोकांना भेटले आणि त्यांच्याशी बोलले तर तुमचा डीएनए बदलत नाही, असे ते म्हणाले.

भाजपच्या जवळीक दाखवणाऱ्या 3 घटना

  • 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने घटनेतील कलम 370 आणि कलम 35A रद्द केले. यानंतर मेहबुबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला यांच्यासह सर्व बड्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते, मात्र यावेळीही गुलाम नबी बाहेर होते.
  • गुलाम नबी आझाद हे फेब्रुवारी 2021 पासून लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य नाहीत. त्याच्याकडे दुसरे कोणतेही महत्त्वाचे पद नाही. असे असूनही त्यांचा लुटियन्स येथील बंगला रिकामा झाला नाही. ऑगस्ट 2022 मध्येच त्यांच्या बंगल्याची मुदतवाढ देण्यात आली होती.
  • 29 ऑगस्ट रोजी गुलाम नबी आझाद एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले, 'मी मोदीजींना क्रूर माणूस मानत होतो. मला असे वाटायचे की जर त्यांनी लग्न केले नसेल आणि त्यांना मुले नसतील तर त्यांना काही फरक पडत नाही, परंतु किमान त्यांच्यात माणुसकी आहे.
बातम्या आणखी आहेत...