आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुल गांधी परदेशात नको अशा उद्योगपतींना भेटतात. गांधी घराण्याचा नेहमीच उद्योगपतींशी संबंध राहिला आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी हे वक्तव्य केले. यानंतर अदानी मुद्द्यावरून केंद्र सरकारवर नेहमीच निशाणा साधणाऱ्या राहुल यांच्याकडे भाजपने उत्तर मागितले आहे.
भाजपने रविवारी गुलाम नबी आझाद यांच्या मुलाखतीची व्हिडिओ क्लिप सर्वप्रथम शेअर केली आणि लिहिले की, ‘राहुल गांधी परदेशात जाऊन अवांछित उद्योगपतींना भेटतात. राहुल गांधींनी सांगावे की, हे उद्योगपती कोण आहेत ज्यांना ते भेटले आणि ही भेट का झाली.’
यानंतर भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनीही सोमवारी पत्रकार परिषद घेऊन राहुल यांना विचारले की, ते कोणते उद्योगपती आहेत ते सांगा तसेच तुमचा अजेंडा काय ते देखील सांगा?
काय म्हणाले भाजप खासदार रविशंकर प्रसाद?
राहुल गांधी भारतविरोधी उद्योगपतींच्या सांगण्यावरून भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मोदीजींच्या विरोधात काम करत आहेत का? गुलाम नबी आझाद यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे की, राहुल गांधी जेव्हाही परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा ते अनेक 'नको असलेले उद्योगपती' यांना भेटतात आणि त्यांचे अनेक उद्योगपतींशी संबंध आहेत. आता देशाला जाणून घ्यायचे आहे की, राहुल गांधी परदेश दौऱ्यात कोणाला भेटतात? हे उद्योगपती कोण आहेत ज्यांना राहुल गांधी भेटतात आणि त्यांच्यात काय 'विलिंग-डीलिंग' आहे. हे 'नको असलेले व्यापारी' कोण आहेत आणि त्यांचे हितसंबंध काय आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रविशंकर प्रसाद यांनी राहुलला आणखी चार प्रश्न विचारले...
1. बोफोर्स प्रकरणाविरोधात राहुल गांधी काही बोलले का?
२. क्वात्रोचीला ज्या पद्धतीने पळवून जावू दिले गेले त्याबद्दल ाही सांगितले का?
3. नॅशनल हेराल्ड प्रकरणात त्यांना काय म्हणायचे आहे... ज्यात ते स्वतः जामिनावर आहे?
4. राहुल गांधींचा अंतिम अजेंडा काय आहे?
राहुल गांधींचा अदानींवर हल्ला आणि आझादचा पलटवार
वास्तविक हे संपूर्ण प्रकरण राहुल गांधींच्या एका ट्विटनंतर समोर आले आहे ज्यात त्यांनी दावा केला होता की, काँग्रेसचे पाच माजी नेते अदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचे हत्यार बनले आहेत. या माजी काँग्रेस नेत्यांमध्ये राहुल गांधींनी गुलाम नबी आझाद यांचेही नाव घेतले होते.
यावर एका मुलाखतीत गुलाम नबी आझाद हे राहुल गांधींच्या दाव्याला उत्तर देताना म्हणाले की, राहुल गांधींनी हे बोलणे लाजिरवाणे आहे. माझा कोणत्याही उद्योगपतीशी संबंध नव्हता. तर त्यांच्या (राहुल गांधी)सह संपूर्ण कुटुंबाचे (गांधी) उद्योगपतींशी संबंध आहेत. आझाद पुढे म्हणाले की, मला त्या कुटुंबाबद्दल खूप आदर आहे, नाहीतर ते देशाबाहेर कुठे गेले आणि उद्योगपतींना भेटले ते मी सांगितले असते. अगदी अनिष्ट व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही ते भेटतात.
काँग्रेस रिमोट कंट्रोलने चालते
माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी यापूर्वी काँग्रेसला फटकारले होते की ते अजूनही "रिमोट कंट्रोल" द्वारे चालवले जात आहे आणि अननुभवी गुंडांचा एक नवीन गट काँग्रेसचा कारभार हाताळत असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते की, मी जितका भूतकाळात जातो तितकी कटुता निर्माण होते आणि पक्षातून बाहेर पडल्यापासून मला त्यात डोकावायचे नाही.
खालील बातमी देखील तुम्ही पण वाचू शकता...
राहुलने 5 माजी काँग्रेसजनांना अदानीशी जोडले; गुलाम, सिंधिया, अँटनी यांचा उल्लेख
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी पुन्हा एकदा अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाला हात घातला आहे. 'ते सत्य लपवतात, म्हणूनच दररोज दिशाभूल करतात, असे ते एका ट्विटमध्ये म्हणाले. यावेळी त्यांनी अदानींच्या कंपन्यांतील 20 हजार कोटींची बेनामी रक्कम कुणाची आहे?', असा सवालही केला. राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये काँग्रेसच्या 5 माजी नेत्यांचाही अदानींशी संबंध जोडला. त्यांनी यासंबंधी ट्विटरवर एक फोटो शेअर केला. त्यात त्यांनी या नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला. पूर्ण बातमी वाचा..
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.