आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनंतर आझाद यांनाही अश्रू अनावर:दहशतवादी हल्ल्यातील लोकांच्या मृत्यूबद्दल म्हणाले - विमानतळावर मुलांनी माझे पाय पकडले, मी ओरडलो - 'हे अल्लाह, हे तू काय केले'

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी राज्यसभेत पंतप्रधान मोदी ज्या दहशतवादी घटनेची आठवण करून रडले, त्याच घटनेची आठवण करत गुलाम नबी आझादही भावूक झाले. त्यांचेही डोळे पाणावले. जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्या गुजरातच्या पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली होती याबाबत गुलाम नबी यांनी सांगितले. गुलाम नबींचे शब्द जशास तसे…

'नोव्हेंबर 2005 मध्ये मुख्यमंत्री झालो... त्यानंतर काश्मीरमध्ये जेव्हा दरबार उघडला तेव्हा गुजरातमधील माझ्या भावंडांच्या बलिदानाने माझे स्वागत करण्यात आले. तेथे अशाप्रकारे स्वागत करण्याचा अतिरेक्यांचा हा मार्ग होता. त्यांना सांगायचे होते की आम्ही आहोत, तुम्ही गैरसमजात राहू नका. निशात बागेत बसवर लिहिले होते की ते गुजरातचे आहेत. त्या बसमध्ये 40-50 गुजराती पर्यटक होते. त्यावर ग्रेनेडचा हल्ला झाला. बारापेक्षा अधिक पर्यटकांचा त्यात मृत्यू झाला. मी तत्काळ तेथे पोहोचलो. मोदीजी संरक्षणमंत्र्यांशी बोलले, मी पंतप्रधानांशी बोललो.'

'मी विमानतळावर पोहोचलो तेव्हा कुणाची आई, कुणाच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलांनी रडत माझे पाय पकडले. तर मीही जोरात ओरडलो, हे देवा हे तू काय केलंस? मी या मुलांना, त्यांच्या बहिणींना काय उत्तर देऊ, जे फिरण्यासाठी येथे आले होते आणि आज मी त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह त्यांच्याकडे सुपूर्त करत आहे.' (हे सांगताना आझाद भावूक झाले)

'आज आम्ही अल्लाह आणि देवाला प्रार्थना करतो की, या देशातून दहशतवाद संपायला हवा. अनेक सुरक्षा कर्मचारी, पॅरामिलिट्री आणि पोलिस कर्मचारी ठार झाले. गोळीबारात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. हजारो आई आणि मुली विधवा झाल्या. काश्मिरची परिस्थिती ठीक व्हावी.'

त्या दहशतवादी घटनेनंतर गुलाम नबी पीडितांना भेटतानाचे व्हिडिओ पहा, पंतप्रधान आणि गुलाम नबी या घटनेवर भावूक झाले...

मोदी आणि शाहांना म्हणाले - तुम्ही काश्मिरला पुन्हा आशियाना बनवा

आझाद पुढे म्हणाले की, 'काश्मिरी पंडित भावंडांसाठी एक शेर म्हणायचा आहे. मी जेव्हा विद्यापीठात जिंकायचो, तेव्हा काश्मिरी पंडीत मला सर्वाधिक मते देत होते. मी माझ्या वर्गमित्रांना भेटलो तेव्हा मला वाईट वाटते. कारण ते काश्मिरी पंडित आहेत, जे घरातून बेघर झाले. त्यांच्यासाठी एक शेर - गुजर गया वो छोटा सा जो फसाना था, फूल थे, चमन था, आशियाना था। न पूछ उजड़े नशेमन की दास्तां, न पूछ कि चार तिनके मगर आशियाना तो था.'

तुम्ही दोघे (मोदी आणि शाह) इथे बसलेले आहाता, तुम्ही पुन्हा त्याला आशियाना बनवा. आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी त्यांनी पुन्हा एक शेर सादर केला. दिल ना उम्मीद तो नहीं, नाकाम ही तो है, लंबी है गम की शाम, मगर शाम ही तो है। बदलेगा न मेरे बाद भी मौजूं-ए-गुफ्तगू, मैं जा चुका होऊंगा, फिर भी तेरी महफिल में रहूंगा.'

बातम्या आणखी आहेत...