आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ghulam Nabi Azad's Criticism Of Rahul Gandhi |Congress Was Built By Sweat, Not By Computers And Tweets

गुलाम नबी आझाद यांची राहुल गांधींवर टीका:कॉम्प्युटर अन् ट्वीटने नव्हे, घाम गाळून उभारली काँग्रेस

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात काँग्रेस पक्ष सोडणारे गुलाम नबी आझाद यांनी प्रथमच जम्मूत सभा घेतली. तेथे त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा सांगितला. ते म्हणाले की, आमच्या पक्षाचा ध्वज आणि नाव काश्मिरी लोकच निश्चित करतील. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा मिळवून देण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. जमिनीची सुरक्षितता, नोकरी, तेथील नागरिकांना अधिकार, काश्मिरी पंडितांचे पुन्हा परतणे आणि पुनर्वसन हे मुद्देही आमच्या प्राधान्यक्रमात असल्याचे त्यांनी नमूद केले.

सभेत कोणाचेही नाव न घेता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना आझाद म्हणाले की, आम्हाला बदनाम करणाऱ्यांची पोहोच सोशल मीडियापर्यंतच आहे. अशा लोकांना माहीतच नाही की काँग्रेस कॉम्प्युटर आणि ट्वीटने नव्हे, तर आम्ही ती आमचे रक्त-घाम गाळून उभी केली आहे. काँग्रेसचे लोक आता बसमधून तुरुंगात जातात, महासंचालक अथवा आयुक्तांना बोलावतात, आपले नाव लिहितात आणि एक तासाच्या आत चालले जातात. त्यामुळेच काँग्रेसची प्रगती होत नाही. सुमारे ५३ वर्षांपर्यंत काँग्रेसमध्ये राहिलेल्या ७६ वर्षीय आझाद यांनी २६ ऑगस्टला पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी काँग्रेस हा संपलेला पक्ष आहे, अशी टिप्पणी केली होती. आझाद २००५ ते २००८ पर्यंत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होते.

व्यासपीठावर राज्यातील माजी काँग्रेस नेते एकत्र आझाद यांच्या सभेच्या व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री ताराचंद, त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा राजीनामा दिलेले अनेक माजी मंत्री, पीडीपीचे माजी आमदार सैयद बशीर यांच्यासह अनेक प्रमुख नेते दिसले.

बातम्या आणखी आहेत...