आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुसाइड:'लग्नाच्या दिवशीच तुला उचलून नेतो', तरुणाने घरात घुसून धमकी दिल्यामुळे तरुणीची आत्महत्या; उत्तर प्रदेशची घटना

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माथेफिरू तरुणाने लग्नाच्या दिवशीच उचलून नेण्याची धमकी दिल्यामुळे एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. हा युवक गत अनेक दिवसांपासून या मुलीला त्रास देत होता. तो तिला मेसेज पाठवत होता. त्याची तिच्याशी बळजबरीने लग्न करण्याची इच्छा होती.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीचे लग्न ठरवले होते. 31 मार्च रोजी मुलीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. ही गोष्ट तरुणाला समजल्याने तो संतापला. त्याने थेट तरुणीच्या घरी जाऊन तिला लग्नाच्या दिवशी उचलून नेण्याची धमकी दिली. तू मला सोडून दुसऱ्या कुणाशी लग्न केले, तर मी तुला लग्नाच्या दिवशी उचलून नेईल. तुला माझ्याशीच निकाह करावा लागेल, असे तो म्हणाला.

शमशादच्या या धमकीचा मुलीने धसका घेतला होता. त्यातच तिने आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांच्या मते, मृत तरुणीची तरुणाशी नियमित बातचीत होत होती.

अशी घडली घटना

31 मार्च रोजी तरुणीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. त्याची कुणकुण शमशादला लागली. त्याने थेट तरुणीचे घर गाठले. तसेच तिला उचलून नेण्याची धमकी दिली. मुलीने ही गोष्ट आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर भाऊ त्याची तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला.

मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, आम्ही घरी परतल्यानंतर आम्हाला मुलीने आत्महत्या केल्याचे दिसले. आमची मुलगी शमशादच्या धमकीमुळे घाबरली होती.

काय म्हणाले पोलिस?

या प्रकरणी डीसीपी वेस्ट विजय ढुल यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपी शमशादचा तपास करत आहेत. तपासात मुलगी आरोपीच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांचा सीडीआर काढला जात आहे.