आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कारमधील प्रवाशांनी फरपटत नेल्याने मुलीचा मृत्यू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या कंझावाला भागात नववर्षाच्या स्वागतादरम्यान कारमधून प्रवास करणाऱ्या तरुणांनी एका मुलीस धडक दिली. अपघातानंतर तरुण पळून जाऊ लागले. मात्र, मुलगी कारखाली अडकली आणि जवळपास ४ किमी रस्त्यावरून फरपटत गेली. रक्तबंबाळ अवस्थेत ती पडून राहिली आणि तिथेच गतप्राण झाली. या संदर्भात बाह्य दिल्लीचे डीसीपी हरेंद्र सिंह म्हणाले, शनिवार-रविवारदरम्यान रात्री ३ वाजता बंझावाल भागात रस्त्याच्या कडेला निर्वस्त्र अवस्थेत मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणात ५ तरुणांना अटक करून कार जप्त केली आहे. सर्वांची वैद्यकीय चाचणी घेतली आहे. २३ वर्षीय मुलगी इव्हेंट मॅनेजमेंटचे अर्धवेळ काम करत होती. रात्री ती घरी जात होती. यादरम्यान आरोपींनी तिला धडक दिली.

बातम्या आणखी आहेत...