आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही वर्षांत शेती क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. मोठ्या संख्येने महिला शेती करतात. इतकेच नाही तर सुशिक्षित व कॉर्पोरेट जगतातील महिलाही आता शेतीत प्रयोग करत मोठी कमाई करत आहेत. यांची उत्पादने पसंतही केली जात आहेत. जाणून घेऊया, छत्तीसगडमधील अशाच बदलाच्या २ कथा...
भाज्या विदेशात पाठवण्याची तयारी
कुरुद्धमधील चरमुडिया गावच्या स्मारिकाने संगणक शास्त्रात बीई, नंतर एमबीए केले. तिला मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी लागली. वार्षिक १० लाखांचे पॅकेज होते. ३४ वर्षांची स्मारिका सांगते, ‘वडील शेतकरी आहेत. जानेवारी २०२० मध्ये लिव्हर ट्रान्सप्लान्टनंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. अशा वेळी २३ एकर शेती व तिथे काम करणाऱ्या १०० मजुरांचे काय, हा प्रश्न होता. मग मी नोकरी सोडून शेतीची जबाबदारी घेतली. उत्तम दर्जाच्या मालामुळे दिल्ली, यूपी, आंध्र, कोलकाता, बिहार, ओडिशात भाज्यांना मागणी आहे. पुढे विदेशात भाज्या पाठवणार आहे.’
महिला हिच्याकडून शिकताहेत शेती
सहा वर्षांपूर्वी १५ एकरपासून शेतीला सुरुवात करणारी ३२ वर्षांची वल्लरी आता तीन गावांत शेती करत आहे. महासमुंदच्या कमरौद गावात २४ एकर जमिनीवर मिरची, पेरू, बांबू, पपई, नारळ, स्ट्राॅबेरीवर फोकस आहे. ती सांगते, ‘एमटेक केल्यानंतर सिर्री गावातून शेती सुरू केली. कमरौदमध्येच २४ एकर जमिनीशिवाय जवळच्या गावात २२ एकर शेती करत आहे.’ वल्लरी वडिलांकडून शेतीचे काम शिकली. ती म्हणते,‘महासमुंदच्या प्रत्येक गावातील महिला बचत गट माझ्याकडून प्रगत शेती शिकत आहेत. कीटक नियंत्रणासाठी नवनवीन प्रयोग करते.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.