आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये मित्रापुढे मैत्रिणीवर गँगरेप:बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला; मुलीची प्रकृती गंभीर, 5 जणांवर FIR

पाटणा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या वैशाली जिल्ह्यात काही नराधमांनी एका अल्पवयीन तरुणीवर पाशवी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. ही तरुणी आपल्या मित्रासोबत एका शेतात बसली होती. तिथे आलेल्या 4-5 जणांनी या दोघांनाही नग्न करुन मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मित्रापुढेच तरुणीवर गँगरेप केला. मुलीची शुद्ध हरपल्यानंतर बलात्कारी पळून गेले. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर टाकला आहे.

मुलीचे वय 15 वर्षे आहे. तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार आहेत. पोलिसांनी या प्रकरणी 5 तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्वत्र छापेमारी केली जात आहे.

प्रकरण वैशाली जिल्ह्याच्या जंदाहा पोलिस ठाणे हद्दीतील आहे. शनिवारी 9वीची विद्यार्थीनी आपल्या मित्राला भेटण्यासाठी एका निर्जनस्थळी गेली होती. दोघेही एका शेतात एकमेकांशी बोलत असताना तिथे काही तरुण येऊन धडकले. त्यांनी दोघांशी अश्लाघ्य शिवीगाळ केली. त्यानंतर पोलिसांना बोलावण्याची धमकी देत मुलीवर बलात्कार केला. यावेळी दोघांनीही त्यांच्यापुढे आपल्याला सोडून देण्याची विनंती केली. त्यांच्या पाया पडले. पण नराधमांनी त्यांना कोणतीही दयामाया दाखवली नाही.

मुलीची शुद्ध हरपल्यानंतर पळाले

यावेळी एका तरुणाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार केला. मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर हल्लेखोर फरार झाले. त्यानंतर त्यांनी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल केला. या घटनेमुळे या भागात एकच खळबळ माजली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. ते व्हायरल व्हिडिओच्या आधारावर आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांची चौकशीही सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...