आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीसाठी बाहेर पडलेल्या 15 वर्षीय मुलीवर बलात्कार:आरोपींनी तिला जंगलात नेले; गळा आवळला मेली म्हणून पळ काढला

आग्रा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा येथे होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडलेल्या 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी ही तरूणी मंगरुळ गुर्जर जंगलात रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळून आली. कुटुंबीय आणि पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले. तिला बोलता येत नाही. डीसीपी विकास कुमार यांनी सांगितले की, आरोपींवर कारवाई करण्यासाठी पोलिस पीडितेच्या जवाबाची प्रतीक्षा करीत आहे.

पोलिसांनी पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिस तिचा जबाब नोंदवणार आहेत.
पोलिसांनी पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिस तिचा जबाब नोंदवणार आहेत.

होळी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती
15 वर्षीय पीडिता आग्रा येथील सिकंदरा भागातील रहिवासी आहे. तिच्या भावाने सांगितले की, गुरुवारी दुपारी 2.30 च्या सुमारास बहिणीने सांगितले की ती होळी खेळण्यासाठी मावशीच्या घरी जात आहे. मावशीचे घर पाचशे मीटर अंतरावर आहे. सायंकाळी सात वाजेपर्यंत ती घरी परतली नाही. तेव्हा आम्ही आन्टीला फोन केला. तेव्हा त्यांनी सांगितले की, ती माझ्या घरी आलीच नाही. त्यानंतर आम्ही शोध सुरू केला. रात्रभर गाव आणि परिसरात शोध घेतला. मात्र, कोणताही सुगावा लागला नाही, त्यामुळे पोलिसांना माहिती दिली.

दूध घेऊन जाणाऱ्याने पीडितेला ओळखले
एका वाटसरूने जंगलात रस्त्याच्या कडेला वेदनेने बेशुद्धअवस्थेत पडलेल्या पीडितेला शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास पाहिले. त्याच गावातील एक दूधवाला त्याच मार्गाने जात होता. त्याने त्या मुलीला ओळखले. त्यानंतर फोनवरून कुटुंबीयांना माहिती दिली.

अंगावर कपडे नव्हते, डोळ्यातून रक्त वाहत होते
पीडितेच्या भावाने सांगितले की, आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा आम्ही पाहिले की बहिणीची अवस्था खूप वाईट होती. दोन मिनिटे शुद्धीवर आली. पुन्हा बेशुद्ध झाली. तिच्या अंगावर कपडे नव्हते. डोळ्यातून रक्त वाहत होते. तिला अतिशय वाईट पद्धतीने ओरबडण्यात आले होते. तिची पाठ सोललेली होती. डोके देखील फुटलेले होते. दोन्ही हात पाय तोडले होते. जणू ती मेली म्हणून नराधमांनी तिला फेकून पळ काढला होता.

बातम्या आणखी आहेत...