आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Give First Corona Dose To All Health Workers Till 20th February, Frontline Workers Till 6th March

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यांना लसीचे उद्दिष्ट:20 फेब्रुवारीपर्यंत सर्व हेल्थ वर्कर्स, 6 मार्चपर्यंत फ्रंटलाइन वर्कर्सना द्या पहिला डोस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे की, कुठल्याही स्थितीत २० फेब्रुवारीपर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि ६ मार्चपर्यंत सर्व फ्रंटलाइन वर्कर्सनाही पहिला डोस द्यावा.त्यानंतरच पहिल्या टप्प्यात सहभागी तिसऱ्या गटाच्या सुमारे २७ कोटी लोकांना लस देण्यास सुरुवात होईल, ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रत्येक सेशन साइटवर शंभर टक्के लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगितले आहे. कोविन अॅपवर नोंदणीकृत सर्व लोकांना कुठल्याही स्थितीत लस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंत्रालयाने म्हटले आहे की, १३ फेब्रुवारीपासून लसीचा दुसरा डोस देण्यास सुरुवात होईल. त्यामुळे त्याआधी स‌र्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस दिला जावा. सहा मार्चपर्यंत फ्रंटलाइन वर्कर्सना पहिला डोस दिल्यानंतर कोणीही वंचित राहू नये म्हणून मॉप-अप राउंड सुरू राहील. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, तीत आतापर्यंतच्या लसीकरणावर चर्चा झाली. फक्त १२ राज्यांतच उद्दिष्ट ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. त्यामुळे स‌र्व राज्यांना वेग वाढवण्यास सांगितले आहे. त्यासाठी राज्यांना आपल्या स्तरावर रणनीतीत बदल करण्याचे निर्देशही दिले आहेत. जिथे लसीकरण साइट तयार करता येऊ शकेल, अशा नव्या जागा शोधण्यासही सांगण्यात आले आहे. आतापर्यंत देशात ९३ लाख आरोग्य कर्मचारी आणि ७० लाख फ्रंटलाइन वर्कर्सची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. मात्र दररोज संख्या वाढत आहे. सरकारी अंदाजानुसार देशात २ कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...