आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Giving Subsistence Allowance To Senior Citizens Is Now Mandatory For Sons in law, Daughters in law, Adopted Children And Relatives

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:‘अपत्य’ शब्दाची व्याप्ती वाढवणार सरकार; ज्येष्ठांना निर्वाह भत्ता देणे आता जावई, सून, दत्तक अपत्य व नातलगांसाठी बंधनकारक

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वीलेखक: मुकेश कौशिक
  • कॉपी लिंक
  • संसदेत लवकरच सादर होणार ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण दुरुस्ती विधेयक

वडिलोपार्जित संपत्ती हडपून आई-वडील किंवा सासू-सासऱ्यांकडे दुर्लक्ष करणे आता अपत्यांना महाग पडू शकते. संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात याबाबत दुरुस्ती विधेयक सादर होईल. त्यात ज्येष्ठ नागरिकांचे निर्वाह भत्ते आणि सन्मानपूर्वक जीवन सुनिश्चित करण्यासाठी कठोर तरतुदी आहेत. दोन वर्षांपूर्वी लोकसभेत सादर माता-पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालनपोषण आणि कल्याण (दुरुस्ती) विधेयक, २०१९ ला संसदेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्याच्या ठोस अंमलबजावणीसाठी शिफारशीही केल्या आहेत. समितीने अपत्याच्या श्रेणीत जावई, सून आणि संपत्तीचा हक्क असलेले दत्तक किंवा सावत्र अपत्य किंवा नातेवाईक यांनाही समाविष्ट करण्याची तरतूद क्रांतिकारी असल्याचे म्हटले.

पोटचे अपत्य नसेल तर ज्येष्ठ नागरिक या अपत्यांकडे पालनपोषणाचा दावा करू शकतील, हे समितीने मान्य केले. नात-नातू व अल्पवयीन मुलांच्या कायदेशीर पालकांनाही अपत्य मानणे आणि सासरा, सासू व आजोबा-आजी यांनाही पालकाच्या श्रेणीत ठेवण्यास मान्यता देण्यात आली. आता अपत्यहीन ज्येष्ठ नागरिकांचा असा कुठलाही कायदेशीर उत्तराधिकारी अपत्याच्या व्याप्तीत असेल जो त्यांच्या संपत्तीचा उत्तराधिकारी आहे किंवा मृत्यूनंतर होऊ शकतो. कोणी अल्पवयीन असेल तर त्याच्या पालकांना नातेवाईक मानून निर्वाहासाठी जबाबदार मानले जाईल. ज्येष्ठांच्या कल्याणात कपडे, निवास, सुरक्षा, वैद्यकीय साहाय्य, उपचार आणि मानसिक आरोग्य यांचाही समावेश केला जात आहे.निर्वाह भत्त्यासाठी १० हजार रुपये प्रति महिन्याची मर्यादा संपवली जात आहे. पालकांच्या गरजा आणि अपत्याच्या उत्पन्नाच्या हिशेबाने भत्ता ठरेल. सध्या देशात १२ कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत.

मोठी शिफारस : ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिस विभागात हवा विशेष अधिकारी
समितीने शिफारस केली आहे की, ज्येष्ठांना डिजिटल, आर्थिक साक्षरतेशी जोडण्यात यावे. पालकांचे एकच अपत्य असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष सुट्या मिळाव्यात. प्रत्येक ठाण्यात सहायक उपनिरीक्षक किंवा मोठ्या श्रेणीचा एक नोडल अधिकारी ज्येष्ठांसाठी असावा. वेगळी आरोग्य केंद्रे असावीत.

बातम्या आणखी आहेत...