आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Glacier Torn In Uttarakhand 'flooded Dhauli River 8 Feb; Crisis From Chamoli To Haridwar Escalates, High Alert Issued

उत्तराखंड दुर्घटना अपडेटस्:तपोवनमध्ये बचाव पथकाने 26 मृतदेह काढले; 197 लोक बेपत्ता, यापैकी 35 जण NTPC च्या बोगद्यात अडकलेत

देहरादूनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ज्या बोगद्यात लोक अडकले, तिथे पाण्याची पातळी वाढल्यामुळे रविवारी बचावकार्य थांबवण्यात आले होते

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील तपोवनमध्ये रविवारी झालेल्या नैसर्गित दुर्घटनेत 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. रविवारी झालेल्या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी बचावकार्य सुरुच आहे. रविवारी हिमकडा नदीत कोसळून ऋषिगंगा आणि धौलीगंगा नद्यांना पूर आला होता. पाणी वाढण्यासोबतच मोठ-मोठे दगडदेखील पाण्यासोबत वाहून गेले. यामुळे तपोवन परिसरातील खासगी कंपनीच्या ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्ट आणि NTPC प्रोजेक्ट साइटचे मोठे नुकसान झाले आहे. NTPC च्या दोन बोगद्यात अद्यापही अनेकजण अडकले आहेत. पहिल्या बोगद्यातून रविवारी 16 जणांना वाचवण्यात आले होते.

आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांवरुन 26 मृतदेह सापडले आहेत. NTPC प्रोजेक्ट साइटवर दोन बोगदे आहेत. पहिल्या बोगद्यातून 16 जणांना वाचवण्यात आले असून, दुसऱ्या बोगद्यात 30 कर्मचारी अडकले आहेत. अडीच किलोमीटर लांब बोगद्यात पाणी भरल्यामुळे रविवारी बचाव कार्य थांबवण्यात आले होते. आता आज NDRF च्या पथकाने पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे बचावकार्य पुन्हा सुरू केले आहे. या बोगद्याचा 100 मीटरपर्यंत अडकलेला ढिगारा हटवण्यात आला आहे.

ठिकाणकिती लोक बेपत्ता
रैणी गाव5
तपोवन ऋत्विक कंपनी121
करछौ2
रिंगी गाव2
ऋषिगंगा कंपनी46
ओम मैटल21
HCC3
तपोवन गाव2

आता अंदाजे अडीच किलोमीटर लांब बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात येत आहे. येथे 40-50 मजूर अडकल्याचा संशय आहे. NDRF चे डीजी एस.एन. प्रधान यांनी सांगितले की, या ठिकाणी 191 लोक काम करत होते. यातील 27 जणांना वाचवण्या आले असून, 11 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 153 जण बेपत्ता असून, यातील काहीजण बोगद्यात अडकल्याची भीती आहे.

चमोली दुर्घटना: दुसऱ्या दिवसाचे अपडेट्स...

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी सांगितले की, बोगद्यातून ढिगारा हटवला जात आहे. मोठ्या बोगद्याला लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तपोवनच्या ज्या बोगद्यात 30 जण अडकले आहेत, तिथे ITBP चे 300 जवान रेस्क्यू करत आहेत. याशिवाय, एअरफोर्सचे Mi-17 आणि ALH हेलिकॉप्टर्सने सोमवारी सकाळी देहरादूनच्या जोशीमठवरुन उड्डाण घेतली आहे. एरियल रेस्क्यू आणि रिलीफ मिशनदेखील सुरू झाले आहे. NDRF आणि ITBP च्या पथकांचे या परिसरात रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचे चकीत करणारे वक्तव्य

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितले की, सध्या या बोगद्यातून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. तिथे चिखल जमा झाल्यामुळे थोडी अडचण ये आहे. सध्या ITBP चे जवान दोऱ्यांच्या सहाऱ्याने बोगद्याच्या तोंडाशी पोहचले आहेत. याच ठिकाणी दोन नद्यांचा संगम असल्यामुळे थोडी अडचण येत आहे. यावेळी त्यांनी एक चकीत करणारे वक्तव्य केले. ते म्हणाले की, येथील ऋषिगंगा प्रोजेक्टबद्दल त्यांना कालच समजले, यापूर्वी त्यांना या प्रोजेक्टबद्दल काहीच माहिती नव्हती.

रविवारी रात्री पाणी पातळी वाढली

रविवारी रात्री ऋषिगंगा आणि धौलीगंगा नद्यांची पाणी पातळी परत वाढली. यानंतर चमोली जिल्हा प्रशासनाने नदी किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सतर्क केले होते. वायुसेना आज दुर्घटनाग्रस्त परिसरांच्या एरियल सर्वेसाठी शास्त्रज्ञांना एअरलिफ्ट करेली. ग्लेशियोलॉजिस्ट्सची दोन पथके या दुर्घटनेमागच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सोमवारी तपोवनला जातील.

बातम्या आणखी आहेत...