आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथंडीत हिमनदी वितळणे ही दुर्मिळ घटना आहे. थंडी, पाऊस, हिमवृष्टी हिमनदीला बळकट करतात. बहुदा या भागात झालेल्या विक्रमी हिमवृष्टीमुळे हे संकट आेढावले असावे असे वाटते. संपूर्ण क्षेत्रात २००० पासून हिमवृष्टी कमी होत गेली आहे. गंगा व ब्रह्मपुत्राच्या पात्राचे किनाऱ्यावरील बर्फाचे भागही संकोचले आहेत. त्यामुळे हिमालयाचा परिसर वेगाने उष्ण होत आहे. म्हणूनच हिमालयातील शिखरांच्या काही भागात तापमान ५ अंशांहून जास्त जाणवते. सोबतच झाडांची कत्तल, डोंगरांवरील बांधकामे ही देखील संकटाचे कारण असू शकते.
बर्फवृष्टीत हिमनदीवर निगराणी ठेवणे कठीण, परिसरात २०० हिमनद्या जोखमींपैकी
या प्रदेशाचा उर्वरित देशापासून संपर्क तुटतो. या काळात येथील वातावरण अत्यंत जोखमीचे बनते. केवळ मार्च ते सप्टेंबरच्या महिन्यांत हिमनदीवर निगराणी ठेवली जाऊ शकते. हिमालयाच्या परिसरात सुमारे ८८०० हिमनद्या आहेत. त्यात २०० हिमनद्या अत्यंत जोखमीच्या श्रेणीत समाविष्ट होतात. हिमालयात येणाऱ्या पुरामागे व्यापक पातळीवरील हिमस्खलन कारणीभूत असते, याचे पुरावे संशोधकांनी अलीकडेच दिले आहेत. उत्तराखंड, हिमालय व काश्मीर भागात सुमारे २०० हिमनद्या आहेत.
सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंतची हिमवृष्टी आता जानेवारी ते मार्चदरम्यान होतेय
पूर्वी हिमालयाच्या रांगांत व मध्य हिमालयाच्या पर्वतांवर सप्टेंबरपासून हिमवृष्टी होत असत. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पडलेला बर्फ मार्चपर्यंत अतिशय कडक होत असत. कारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीमध्ये हिमवृष्टी होत असे. त्यामुळे बर्फाचा थर जाड असे. परंतु आता सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत होणारी हिमवृष्टी जानेवारी ते मार्च अशी पुढे ढकलल्या गेली आहे. या काळात बर्फाला कडकपणा येणारा पुरेसा कालावधी मिळत नाही. कारण मार्चनंतर उष्णता वाढू लागते.
युरोपातील विषारी वायू पश्चिमी विक्षोभासह वाहू लागल्याने वातावरण बिघडतेय
अलीकडेच वाडिया इन्स्टिट्यूटच्या एका संशोधनात युरोपातील विषारी वायू हिमालयातील वातावरण बिघडवू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. हे प्रदूषण हिमालयातील हिमनद्यांमध्ये कार्बन रूपाने चिकटू लागले आहे. त्यामुळे हिमनद्या वितळू लागल्या आहेत. जानेवारीत ब्लॅक कार्बन भारतातून नव्हे युरोपातील विविध देशांतील पश्चिम विक्षोभासोबत वाहून येते. जानेवारीत पश्चिम विक्षोभ पाऊस घेऊन येतो. त्याच्यासोबत वायूही येत आहे. म्हणजेच वितळण्यामागील कारण स्थानिक, वैश्विकही आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.