आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रवास आणि सुटीशी संबंधित व्यवसायात प्रचंड तेजी आली आहे. जगभरात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. उद्योग तज्ज्ञांच्या मते, २०१९ मध्ये हाेती तितकी जागतिक हवाई प्रवाशांची संख्या २०२३ पर्यंतच गाठली जाईल. यापूर्वी तितके प्रवासी पुन्हा मिळवण्यासाठी २०२४ उजाडेल, असा अंदाज वर्तवला जात हाेता. भारतात उन्हाळ्याच्या सुट्यांत प्रवास आणि हॉटेल बुकिंगमध्ये १७८% वाढ झाली आहे.
युरोप-अमेरिकेत गेल्या महिन्यात सुट्यांमध्ये इतके लोक प्रवासाला निघाले की विमानतळांवर रांगा लागल्या. अमेरिकेत मेमोरियल डे वीकेंडच्या आसपास ४ दिवसांतच ३००० उड्डाणे रद्द करण्यात आली. मात्र त्याचा सकारात्मक पैलू म्हणजे विमान प्रवास क्षेत्र वेगाने पूर्वपदावर येत आहे. ‘ओएजी’ या संस्थेनुसार, ६ जूनपासून सुरू झालेल्या आठवड्यात युरोपियन एअरलाइन्समध्ये उपलब्ध जागांची संख्या जून २०१९ मधील त्याच आठवड्यापेक्षा फक्त ९% कमी होती. उत्तर अमेरिकेत ती ५.६% इतकी कमी होती. ‘आयएटीए’चे प्रमुख विली वॉल्श म्हणतात की, आम्ही अपेक्षेपेक्षा एक वर्ष आधीच २०१९ चा स्तर गाठू, याचे हे आकडे निदर्शक आहेत.
इकडे भारतातील ६० शहरांमधील १.९१ लाख हॉटेल्समधील मागणीच्या विश्लेषणावर आधारित, ‘रेटगेन’ अहवाल प्रवास खर्चात वाढ होऊनही देशातील प्रवासी आणि सुटी घालवणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दर्शवताे. मे २०२१ च्या तुलनेत मे २०२२ मध्ये हॉटेल बुकिंगमध्ये १७८% वाढ झाली आहे. हिल स्टेशन्समध्ये जिथे हॉटेल बुकिंग एप्रिलमध्ये १५०% वाढले होते. मे महिन्यात या ठिकाणांवरील बुकिंगदेखील मागील वर्षाच्या तुलनेत ६०% वाढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.