आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Global Hunger Index 2021| India Slips To 101st Place In The List| Afghanistan And Somalia

ग्लोबल हंगर इंडेक्स 2021:यादीमध्ये 101 व्या स्थानावर आला भारत, अफगाणिस्तान आणि सोमालिया सारख्या देशांच्याही पुढे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात भुकबळीची चिंताजनक पातळी

116 देशांच्या ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2021 मध्ये भारत 101 व्या क्रमांकावर घसरला आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये 107 देशांमध्ये भारताचा 94 वा क्रमांक होता. या निर्देशांकात भारत आपल्या शेजारी देश पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्याही मागे आहे. अहवालात असे म्हटले गेले आहे की भारतातील लोक कोविड -19 आणि त्यामुळे घातलेल्या निर्बंधांमुळे वाईट रीतीने प्रभावित झाले आहेत.

भारतात भुकबळीची चिंताजनक पातळी
आयरिश एजन्सी कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मन संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात भारतातील भुकेची पातळी 'चिंताजनक' असल्याचे वर्णन केले आहे. अहवालानुसार शेजारी देश जसे की, नेपाळ (76), बांगलादेश (76), म्यानमार (71) आणि पाकिस्तान (92) हे शेजारी देशही 'अलार्मिंग' उपासमारीच्या श्रेणीत आहेत. चीन, ब्राझील आणि कुवैतसह अठरा देशांनी अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांचा GHI स्कोअर पाचपेक्षा कमी आहे. भारताचा GHI स्कोअर 27.5 आहे.

यादीमध्ये भारतापेक्षा मागे केवळ हे देश

देशरँकजीएचआई स्कोअर
पापुआ न्यू गिनी10227.8
अफगाणिस्तान10328.3
नाइजीरिया10328.3
कॉन्गो10530.3
मोजाम्बिक10631.3
सिएरा लियोन10631.3
तिमोर लेस्टे

108

32.4
हैती10932.8
लाइबेरिया11033.3
मैडागास्कर11136.3
डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉन्गो11239.0
चैड11339.6
सेंट्रल अफ्रीकन रिपब्लिक11443.0
यमन11545.1
सोमालिया11650.8

GHI ची गणना चार निर्देशकांचा वापर करून केली जाते
GHI गुणांची गणना चार संकेतकांवर केली जाते - अंडर नरिशमेंट; चाइल्ड वेस्टिंग (पाच वर्षांखालील मुले ज्यांचे वजन त्यांच्या उंचीच्या हिशोबाने कमी आहे), चाइल्ड स्टंटिंग (पाच वर्षांखालील मुले ज्यांची वयाच्या हिसोबाने उंची कमी आहे) आणि चाइल्ड मॉर्टेलिटी (पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर).

बातम्या आणखी आहेत...