आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Global Warming In Badrinath: Snow Disappeared From Badrinath Dham In March | Marathi News

ग्लोबल वॉर्मिंगने वाढवली चिंता:मार्चमध्येच बद्रीनाथ-केदारनाथ धाममधून गायब झाला बर्फ, आता उंच पर्वतही धोक्यात

डेहराडून4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लोबल वॉर्मिंगने देवालाही सोडलेले नाही. यावेळी पर्वत भागांमध्ये चांगली बर्फवृष्टी होऊनही ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम दिसू लागला आहे. दरववर्षी बद्रीनाथ धाममध्ये या काळात चार फूट बर्फ असायचा, तिथे आता बर्फ नाही. यंदा केदारनाथ धाम परिसरात बर्फ वितळल्याने बर्फ हटवण्याची गरज पडली नाही.

उंच शिखरे देखील हिमविरहित
गंगोत्री आणि यमुनोत्रीमध्येही यंदा नाममात्र बर्फ राहिला आहे. पाऊस पडला नाही आणि उष्णता अशीच राहिली तर उंच शिखरेही हिमविरहित होतील, असे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. वास्तविक, मार्च महिन्यात बद्रीनाथ धाममध्ये सुमारे तीन ते चार फूट बर्फ साचला होता, जो आता वेगाने वितळत आहे. येथे तप्तकुंड, परिक्रमा स्थळ, परिसर आणि आस्था मार्गावर बर्फ पूर्णपणे वितळला आहे. येथून 3 किमी दूर देशातील शेवटचे गाव मानामध्येही बर्फ वेगाने वितळत आहे. फेब्रुवारी महिन्यात येथे पाच ते सहा फूट बर्फ साचला होता.

गेल्या वर्षी 15 एप्रिलपर्यंत बर्फ होता
पूर्णपणे बर्फाने झाकलेल्या बामणी गावातही बर्फ गायब झाला आहे. 20 मार्चपर्यंत गंगोत्री धामच्या आसपासचा बर्फ वितळून गेलेला होता. गेल्या वर्षी 15 एप्रिलपर्यंत धाममधील बर्फ गोठलेला दिसत होता. यमुनोत्री धामचीही स्थिती तशीच आहे. इथेही बर्फ झपाट्याने वितळत आहे.

केवळ हेमकुंड साहिबमध्ये दहा फुटांपर्यंत बर्फ
दिलासादायक बाब म्हणजे प्रसिद्ध हेमकुंड साहिब अजूनही सुमारे 10 फूट बर्फाने झाकलेले आहे. हेमकुंड साहिबच्या आस्था पथ आणि गुरुद्वारातील बर्फ हटवण्यासाठी लष्कराचे जवान 15 एप्रिलपर्यंत येथे पोहोचतील. हवामानातील बदल असाच सुरू राहिला तर मे महिन्यापर्यंत हेमकुंडातील बर्फही वितळेल.

122 वर्षांतील सर्वात उष्ण महिना
मार्च 2022 हा महिना गेल्या 122 वर्षांतील सर्वात उष्ण ठरला आहे. मार्च महिन्यातच पारा चाळीशीच्या पुढे गेला होता. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे ग्लोबल वार्मिंग. यापूर्वी, मार्च 2010 मध्ये सामान्य सरासरी तापमान 33.09 अंश सेंटीग्रेड होते, तर मार्च 2022 मध्ये सरासरी तापमान 33.1 अंश सेंटीग्रेडपर्यंत वाढले होते.

जर आपण मार्च 2020 बद्दल बोललो, तर उत्तर पश्चिम भारतातील अनेक भागात तीव्र उष्णता होती. गेल्या काही वर्षांत, आपण सामान्यपेक्षा जास्त उष्णता, थंडी आणि पाऊस अनुभवला आहे.

बातम्या आणखी आहेत...