आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Global Warming Will Not Melt Himalayan Glaciers, Water Will Remain In River Ganga, There Will Be No Drought

दिव्य मराठी विशेष:ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयातील हिमनद्या वितळत नाहीत, गंगा नदीत पाणी राहील, दुष्काळ पडणार नाही

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली पर्यावरणाबाबतच्या अनेक जर्नल्समध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालय क्षेत्रातील हजारो हिमनद्या वेगाने वितळत असल्याचा इशारा दिला जातो. यामध्ये गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रसारख्या नद्यांच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात घट येईल आणि दुष्काळ पडण्याचाही इशारा आहे. २००७ मध्ये आयपीसीसीने(इंटरनॅशनल पॅनल ऑन क्लायमेट चेंज) दावा केला होता की, २०३५ पर्यंत हिमालयातील सर्व हिमनद्या गायब होऊ शकतात. अर्थतज्ज्ञांनीही २०१९ मधील विशेष अहवालात दावा केला होता की, गंगेचा जवळपास ७०% प्रवाह हिमालयाच्या हिमनद्यांतून वितळल्याने येतो. गंगा खोऱ्यात उत्तर भारत आणि बांगलादेशचे मोठ्या लोकसंख्येचे राज्य आहेत आणि येथे कोट्यवधी लोक राहतात. त्यामुळे हिमनद्या वेगाने वितळतील आणि त्या गायब होण्यासोबत शेतीही उद्‌ध्वस्त होईल, अशी चिंता विश्लेषकांना होती.

मात्र, कॅटो इन्स्टिट्यूटचे रिसर्च फेलो स्वामिनाथन एस. अंकलेसरिया अय्यर आणि हिमनदी तज्ज्ञ विजय के. रैना यांच्या नव्या अभ्यासात तसे काही होणार नसल्याचा दावा केला आहे. अभ्यासानुसार, हिमालयात हिमनदी वितळण्याची प्रक्रिया अलीकडच्या तापमान वाढीने सुरू झाली. हे हिमयुगाच्या समाप्तीनंतर म्हणजे, ११,७०० वर्षांपासून वितळत आहेत. इस्रोच्या ताज्या छायाचित्रातून पुष्टी होते की, २००२ ते २०११ दरम्यान हिमालयात बहुतांश हिमनद्या स्थिर राहिल्या. काही हिमनद्याच संकुचित झाल्या आहेत . वास्तव असे आहे की, गंगा नदीचे स्रोत गंगोत्री हिमनदीचे मागे हटणे घटून ३३ पॅूट प्रतिवर्ष झाले आहे. अशाप्रकारे ती ३ हजार वर्षांपर्यंत कायम असेल. अय्यर यांच्या मते साधारणपणे गंगा पात्रात मोठी हिमवर्षा होते. जी ८.६० लाख चौरस किमी वाढली आहे. अनेक वेळा ते हिमनदीचे क्षेत्रही झाकून टाकते. हा बर्फ वसंतात वितळतो आणि उन्हाळ्यात गंगा नदीला पाणी येते. वास्तविक हिमनद्या वितळण्याचा गंगा नदीच्या प्रवाहात केवळ १ टक्क्यापेक्षा कमी योगदान आहे. तथापि, आतापर्यंत असे म्हटले जात हाते की गंगेचे स्रोत गंगोत्री हिमनदी आहे. परंतु असे नाही. नद्यांचा प्रवाह पाऊस आणि हिमवृष्टीमुळे असतो. जो हिमनद्या बेपत्ता झाल्यावरही कायम राहतो.

हिमनद्या वितळण्याचे गंगेच्या प्रवाहातील योगदान केवळ १ टक्क्यांपेक्षाही कमी अनेक अभ्यासांतून स्पष्ट झाले की, ग्लोबल वाॅर्मिंगमुळे महासागरांमुळे अधिक बाष्पीभवन होते. वातावरणात अधिक ढग जमतील. अशाही वेळी गंगेचा प्रवाह कायम असेल. त्यामुळे दुष्काळ पडणे आणि गंगेशी निगडित देशांत (भारत, चीन आणि पाकिस्तान) युद्धासारख्या गोष्टी अतिशोयोक्ती ठरतील. त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही.

बातम्या आणखी आहेत...