आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Goa Court Acquittes Tarun Tejpal । Sexual Harassment Case On May 21 । Tehelka Case । Tarun Tejpal Verdict

बलात्काराच्या आरोपातून मुक्तता:तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची सर्व आरोपातून मुक्तता, साडेसात वर्षांपूर्वी लागले होते आरोप

पणजी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोबत काम करणाऱ्या तरुणीने लावले होते बलात्काराचे आरोप

तहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना बलात्कार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. गोवाच्या कोर्टाने तेजपाल यांची सर्वच आरोपातून मुक्तता केली आहे. तेजपाल यांच्यावर तहलका मासिकाच्या एका कार्यक्रमात गोवातील एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याचे आरोप लागले होते.

अॅडीशनल डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट 27 एप्रिलला निर्णय देणार होती, पण जज क्षमा जोशींनी निर्णय 12 मेपर्यंत स्थगित केला होता. यानंतर 12 मे रोजी निर्णय 19 मेपर्यंत टाळण्यात आला होता. प्रकरणाचा निर्णय पुढे ढकलण्यामागे कोर्टाने कोरोनाचे कारण दिले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण ?
2013 मध्ये तेजपाल यांच्यासोबत काम करणाऱ्या एका तरुणीने त्यांच्यावर गोवातील एका फाइव्ह स्टार हॉटेलच्या लिफ्टमध्ये बलात्कार केल्याचे आरोप लावले होते. 30 नोव्हेंबर 2013 ला तेजपाल यांना अटक झाली होती. मे 2014 पासून तेजपाल जामीनावर होते.

बातम्या आणखी आहेत...