आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Goa Election Result 2022 | 3 Independent MLAs Support BJP, BJP Will Establish Power In Goa Pramod Sawant | Marathi News

गोव्‍यात भाजपची सत्‍ता:3 अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा, गोव्‍यात भाजप सत्‍ता स्‍थापन करणार- प्रमोद सावंत

पणजी7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्‍यात भाजप सत्‍ता स्‍थापन करणार हे आता स्‍प्‍ष्‍ट झाले आहे. संपूर्ण निकाल जाहीर होताच, आम्‍ही सत्‍ता स्‍थापन करणार असा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला आहे. भाजपची बहूमताच्‍या दिशेने होणारी वाटचाल पाहता गोव्‍यातील 3 अपक्ष उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यात डिचोलीचे अपक्ष उमेदवार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी देखील भाजपला पाठिंबा दिला आहे.

गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ तानावडे यांच्याशी संपर्क साधून 3 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे कळवले आहे. भाजपला असलेले स्‍पष्ट बहुमत पाहता आम्ही सरकार स्थापन करणार अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. अपक्ष उमेदवार पाठिंबा देत आहे तर आम्‍ही पाठिंबा घेत आहोत असेही सावंत म्हणाले. गोव्यात मगोने देखील भाजपला पाठिंबा असल्‍याचे सावंत यांनी सांगितले आहे.

महाराष्‍ट्रातील सर्व भाजप नेत्‍यांनी गोव्‍यात खूप चांगली कामगिरी केली असल्‍याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केले आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करत बाजी मारली आहे. केंद्रीय संसदीय मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर आम्ही सत्ता स्थापनेसाठी दावा करू महाराष्‍ट्रातील सर्व भाजप नेत्‍यांनी गोव्‍यात खूप चांगली कामगिरी केली असल्‍याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केले आहे.

बातम्या आणखी आहेत...