आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NDA ला अजून एक धक्का:गोवा फॉरवर्ड पार्टीने केली NDA सोडण्याची घोषणा; 2019 पासून दोन्ही पक्षात उडत होते खटके

पणजी9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोवा फॉर्वर्ड पार्टीने भाजप सरकारवर विभाजन करणाऱ्या राजकारणाचे आरोप लावले

भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी( NDA)ला अजून एक मोठा धक्का बसला आहे. गोवा राज्यात भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) ने NDA सोडण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी NDA चे चेअरमन आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे एनडीए सोडत असल्याचे सांगितले.

गोवा राज्यात सध्या भाजपचे सरकार आहे. भाजपला गोव्यात गोवा फॉरवर्ड पार्टीचा पाठिंबा होता. पण, 2019 पासून दोन्ही पक्षात खटके उडत होते. तेव्हा GFP च्या नेत्यांनी भाजप सरकारनवर अनेक आरोप केले होते. विजय सरदेसाईंनी आरोप लावला की, प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाती गोवा सरकारचे अनेक नियम राज्याच्या हिताचे नाहीत. हा गोव्यातील जनतेसोबत धोका आहे. त्यांनी भाजपवर विभाजन करणाऱ्या राजकारणाचे आरोप लावले.

2022 मध्यो गोव्यात निवडणुका

गोवा फॉरवर्ड पार्टीचा एनडीए सोडण्याचा निर्णय तेव्हा आलाय, जेव्हा लवकरच राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. गोवा राज्याची विधानसभा निवडणूक 2022 मध्ये असून, यात भाजपला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

बातम्या आणखी आहेत...