आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवा मंत्रिमंडळाचं बहुप्रतीक्षित खातेवाटप अखेर जाहीर झालं. गेल्या काही दिवसांपासून या खातेवाटपाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. खातेवाटपाला उशिर होत असलेल्या सरकारबाबत अनेक उलट-सुलट चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत होत्या. मात्र, आज अखेर हे खातेवाटप जाहीर झालं आहे आणि या सर्व चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गृह, वित्त, दक्षता, कार्मीक, राजभाषा ही खाती स्वतःकडेच ठेवली आहेत. तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये असलेले विश्वजीत राणे यांना आरोग्य, नगरविकास व नगरनियोजन, महिला व बाल कल्याण आणि वने खाते देण्यात आले आहे.
माविन गुदिन्हो यांना उद्योग व कौशल्य विकास, पंचायत, वाहतूक, राज शिष्टचार व संसदीय व्यवहार खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. रवी नाईक यांना कृषी, हस्तकला व गॅझेटर, नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खाते देण्यात आले. तसचे नीलेश काब्राल यांना संसदीय कार्य, पर्यावरण, विधी व न्याय, सार्वजनिक बांधकाम ही खाती देण्यात आली आहेत. तर सुभाष शिरोडकर यांना जलस्रोत, प्रोव्हेदोरीया, सहकार ही तीन खाती देण्यात आली आहेत. रोहन खंवटे यांना पर्यटन, माहिती व तंत्रज्ञान, प्रिंटिंग स्टेशनरी हे खाते देण्यात आले. याशिवाय, गोविंद गावडे यांना क्रीडा, कला संस्कृती, आरडीए या खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच बाबुश मोंसेरात यांना महसूल, कामगार व कचरा व्यवस्थापन खाते देण्यात आले.
भाजपला स्पष्ट बहूमत -
गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवलेआहे. तसेच अपक्ष मिळून भाजपकडे सध्या 25 आमदारांचे संख्याबळ आहे. गोव्यामध्ये विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. यामध्ये 20 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तसेच भाजपने गोव्यातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या ( MGP) 2 आमदारांनी आणि तीन अपक्ष आमदारांना पाठिंब्याची पत्रे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना सुपूर्द केली होती. गेल्या 28 मार्चला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण खाते वाटप बाकी होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.