आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Goa News And Updates The Chief Minister's Efforts To Ensure That The Law In Karnataka Does Not Reduce The Problem Of Beef In Goa

गोमांस:कर्नाटकातील कायद्यामुळे गोव्यात अडचण, गोमांस कमी पडू नये म्हणून मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न

पणजीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटकातून गोव्याला गोमांसाचा मोठा पुरवठा होत असतो

दोन आठवड्यांपूर्वीच कर्नाटक सरकारने 'कर्नाटक प्रिव्हेन्शन ऑफ स्लॉटर अ‍ॅण्ड प्रिझव्‍‌र्हेशन ऑफ कॅटल बिल, 2020' हा कायदा मंजूर केला आहे. यामुळे आता आता राज्यात गाईंसोबतच म्हशी आणि रेड्यांनाही संरक्षण देण्यात आले आहे. आता या जनावरांची हत्या करणे कायद्याने गुन्हा ठरणार आहे. परंतू, याच निर्णयामुळे गोव्यामध्ये गोमांसाची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे गोमांसासाठी आता गोवा इतर राज्यांकडून होणाऱ्या पुरवठ्यासंदर्भात चाचपणी करत असल्याची माहिती भाजप नेते आणि गोव्याचे मुख्यमंत्र प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिली.

याबाबत बोलताना सावंत म्हणाले की, गोव्याचा मुख्यमंत्री म्हणून राज्यातील लोकसंख्येच्या 30 टक्के असणाऱ्या अल्पसंख्यांकांच्या आहारातील प्रमुख घटक असणाऱ्या गोमांसाचा सुरळीत पुरवठा होत राहिल आणि राज्यात गोमांसाचा तुटवडा जाणावर नाही यासंदर्भातील संपूर्ण कळजी घेतली जाईल , अशी माहिती सावंत यांनी दिली.

'कर्नाटकने गोमांसावर बंदी घातल्याने अडचण निर्माण झाली आहे. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक हा गोव्यामध्ये मांस पुरवठा करणारे प्रमुख राज्य आहे. मी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालकांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या समस्येबद्दल काय करता येईल याबद्दल मी माहिती मागवली आहे. आम्ही राज्यातील गोमांसचा पुरवठा सुरळीत रहावा म्हणून इतर राज्यांमधून मांस आयात करत आहोत, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...