आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Goa Oxygen Leak Case Updates: South Goa District Hospital Oxygen Leak Case News And Live Updates

ऑक्सिजन गळती:दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात टँकरमधून ऑक्सिजन गळती; सुदैवाने टळली दुर्घटना

रायगड2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टँकरमधील ऑक्सिजन टाकीत भरताना झाली दुर्घटना

देशात ऑक्सिजन गळतीच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. यापूर्वी अशा घटनेमध्ये कित्येक लोकांनी आपले प्राण गमावले आहे. अशीच एक गोवा राज्यातील मडगाव शहरातील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मंगळवारी घडली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, त्यांना गळती रोखण्यात यश आले असून दुर्घटनेवर नियंत्रण मिळवता आले आहे.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात घडला प्रकार

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हे कोव्हिडच्या रुग्णांवर उपचार करणारे जिल्ह्यातील सर्वात मोठे सरकारी हॉस्पिटल आहे. फातोर्डा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य टाकीमध्ये टँकर मधला ऑक्सिजन भरत असताना ही गळती झाली. “यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. गळतीवर काही मिनिटांत पूर्णतः नियंत्रण मिळविले आहे,” असे त्यांनी सांगितले.

टँकरमधील ऑक्सिजन टाकीत भरताना झाली दुर्घटना
जिल्हा प्रशासनाच्या अधिका-याने सांगितले की, “आम्ही या घटनेची चौकशी करणार असून याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे.” दरम्यान प्रत्यक्षदर्शी आणि रुग्णालयाचे कर्मचारी बाजीराव देसाई यांनी सांगितले की, टँकर मधला ऑक्सिजन टाकीत भरत असताना पाईप लिकेज झाला आणि ही दुर्घटना घडली आहे.

बातम्या आणखी आहेत...