आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Goa State Assembly Election 2022 | Arvind Kejriwal's Big Announcement On The Backdrop Of Goa Elections; After AAP Comes To Power, Goa Will Get Free Electricity And Water | Marathi News

केजरीवालांचे आश्वासन:गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; 'आप'ची सत्ता आल्यानंतर गोव्यात मोफत वीज आणि पाणी मिळणार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एक मोठी घोषणा केली आहे. गोव्यात जर आम आदमी पार्टीची सत्ता आली तर, गोव्यात वीज आणि पाणी मोफत देऊ अशी घोषणा करण्यात आली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. 'आप'ने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात मोफत वीज आणि पाणी देण्याची घोषणा केली आहे. गोव्यातील जनतेने आम्हाला निवडून दिले तर दिल्ली प्रमाणे मोफत वीज आणि पाणी दिले जाईल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून, राजकीय पक्ष आता मतदारांना आश्वासन देताना पाहायला मिळत आहे. त्यापार्श्वभुमीवर केजरीवाल यांनी देखील गोव्यात मोफत वीज आणि पाणी देण्याची घोषणा देली आहे.

दरवर्षी दोन लाखांचा फायदा : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यातील जनतेला संबोधित करताना सांगितले की, जर त्यांचा पक्ष यावेळी गोव्यात सत्तेवर आला तर पाच वर्षांत प्रत्येकाला किमान दहा लाखांचा फायदा करुन दिला जाईल. असे देखील आश्वासन दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...