आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Godhra Bilkis Bano Gang Rape Case 2002 All Eleven Convicts Sentenced To Life Imprisonment

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरण:गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार 11 दोषींची सुटका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सर्व 11 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्वांना गोध्रा येथील सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. यांची गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. हे दोषी 2002 मध्ये बिलकिस बानोवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते.

गोध्रा ट्रेन आगीच्या घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात मार्च 2002 मध्ये गर्भवती बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार झाला होता. या हिंसाचारात त्यांच्या कुटुंबातील 7 जणांचाही मृत्यू झाला होता. तर कुटुंबातील इतर सहा सदस्य कसेतरी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्यांचे प्राण वाचले होते. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने बिल्किस बानो यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश दिले.

सुप्रीम कोर्टात याचिका

जन्मठेपेची शिक्षा झालेल्या या सर्व दोषींनी 15 वर्षे तुरुंगवास भोगला आहे. यानंतर आरोपींनी कलम 432 आणि 433 अन्वये सजा माफ व्हावी म्हणून गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, तिथे निर्णय न झाल्याने त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर सुप्रीम कोर्टाने गुन्हा गुजरातमध्ये घडल्याने गुजरात सरकार निर्णय घेऊ शकते असे म्हटले होते.

सुटकेचे आदेश

सुप्रीम कोर्टाने 9 जुलै 1992 च्या माफी धोरणानुसार अर्जावर विचार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सरकारने एक समिती बनवली. पंचमहालचे जिल्हाधिकारी सुजल मेत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. समिती सदस्यांनी एकमताने दोषींची सुटका करण्याचा निर्णय घेत शिफारस सरकारला केली होती. त्यानंतर त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...