आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Godhra Train Burning Case Convicts Bail Hearing Update Supreme Court | Godhra Case

सुप्रीम कोर्टात 'गोध्रा'च्या आरोपीला जामीन:सरन्यायाधीशांचे खंडपीठ म्हणाले - त्याने रेल्वेवर दगड फेकले होते, 17 वर्षे तुरुंगवास भोगला

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे गोध्राकांडाचे संग्रहित छायाचित्र आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुजरात दंगलीशी संबंधित 9 पैकी 8 खटले बंद करण्याचे आदेश दिले होते. एवढा कालावधी लोटल्यानंतर त्यावर सुनावणी करण्यात काहीच अर्थ नाही, असे ते म्हणाले होते. 

सुप्रीम कोर्टाने गुरुवारी गोध्रा रेल्वे जळीतकांडातील एक आरोपी फारुखला जामीन मंजूर केला. त्याच्या शिक्षेविरोधातील याचिका 2018 पासून प्रलंबित होती. या प्रकरणी सरन्यायाधीश म्हणाले -फारुखने 17 वर्षांची शिक्षा भोगली होती. त्याची भूमिका केवळ रेल्वेवर दगडफेक करण्याची होती.

जामिनाचा विरोध करताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता म्हणाले, "हे सर्वात क्रूर गुन्ह्यांपैकी एक होते. सामान्य स्थितीत दगडफेक कमी गंभीर गुन्हा असू शकतो. पण ही बाब पूर्णतः वेगळी आहे."

SG म्हणाले लवकर सुनावणी घ्या

सरकारतर्फे युक्तिवाद करणारे SG मेहता म्हणाले - प्रकरण अंतिम सुनावणीसाठी तयार आहे. आता कालबद्ध सुनावणीसाठीही विशेष खंडपीठ आहे. हे प्रकरणही लिस्टेड करता येऊ शकते. CJI म्हणाले - मिस्टर SG,तुम्हाला हे करता येईल. आपल्या कनिष्ठांना एक तपशील तयार करण्याची सूचना करा. ते रजिस्ट्रार पुनीत सहगल यांना पाठवा. मी ते अवश्य पाहील."

यापूर्वी 2 डिसेंबर 2022 रोजी गोध्रा जळीत कांडाची सुनावणी झाली होती. त्यात CJI डी वाय चंद्रचूड व न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारकडे आरोपींच्या घटनेतील सहभागाची विस्तृत माहिती मागवली होती.

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

खंडपीठ म्हणाले होते -प्रथम जामीन याचिका ऐकणार

2 डिसेंबर रोजी एक दोषी फारुखची जामीन याचिका खंडपीठापुढे पोहोचली होती. तेव्हा SG नी सुनावणी जानेवारीपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली होती. पण फारुखच्या वकिलांनी त्यावर हरकत नोंदवत या प्रकरणी हिवाळी सुट्ट्यांपूर्वी सुनावणी घेण्याची मागणी केली होती. सरकार या प्रकरणी दुसऱ्यांदा प्रकरण लांबणीवर टाकण्याची मागणी करत असल्याचा आरोप करत त्यांनी केला होता.

सॉलिसीटर जनरल असेही म्हणले होते की, "जामीन याचिकांवर सुनावणी झाली, तर सर्वकाही सोडवता येऊ शकते." त्यावर खंडपीठाने सर्वप्रथम जामीन याचिकांवर विचार करण्याचा निर्णय घेतला होता.

गोध्रा कांडाच्या 31 दोषींना जन्मठेप

गोध्रा कांडानंतर जवळपास 9 वर्ष चाललेल्या खटल्यानंतर 31 जणांना दोषी घोषित करण्यात आले होते. 2011 मध्ये एसआयटी कोर्टाने 11 दोषींना फाशी व 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2017 मध्ये गुजरात हाय कोर्टाने 11 दोषींच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर केले होते.

13 मे 2022 रोजी न्यायालयाने एक आरोपी अब्दुल रहमान धंतिया कंकट्टो जम्बुरो याला 6 महिन्यांचा जामीन दिला होता. रहमानच्या पत्नीला टर्मिनल कँसर आहे. त्याच्या मुली मानसिक आजारी आहेत. 11 नोव्हेंबर रोजी त्याच्या जामिनाची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली.

गोध्राकांडात 59 जण ठार, त्यानंतर उसळलेल्या दंगलीत शेकडोंचा बळी

2002 मध्ये गुजरातच्या गोध्रा स्थानकावर एक दुखद घटना घडली होती. अहमदाबादला जाण्यासाठी साबरसाठी एक्सप्रेस गोध्रा स्थानकावरून निघाली होती. पण कुणीतरी चेन ओढून गाडी रोखली. त्यानंतर अचानक तिच्यावर दगडफेक सुरू झाली. त्यानंतर रेल्वेच्या एस-6 कोच पेटवून देण्यात आला. त्यात अयोध्येतून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता.

गोध्रा कांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत 1 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला होता. त्यात 790 मुस्लिम व 254 हिंदू समुदायाच्या नागरिकांचा समावेश होता. गोध्रा कांडानंतर दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या गुलबर्ग हाउसिंग सोसायटीत संतप्त जमावाने 69 जणांची हत्या केली होती. या दंगलीमुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...