आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gold Loan ; Corona ; You Can Take A Gold Loan To Deal With The Money Problem In The Corona Era, Know Here Where Getting Cheap Loan

महत्त्वाची बातमी:कोरोना काळात पैशांची समस्या दूर करण्यासाठी घेऊ शकता गोल्ड लोन, येथे जाणून घ्या कुठे भेटत आहे स्वस्त कर्ज

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बँक आणि NBFC 12 ते 36 महिन्याच्या कालावधीसाठी कर्ज देतात

कोरोना काळात लोक पैशाच्या समस्येला तोंड देण्यासाठी गोल्ड लोनचा आधार घेत आहेत. याचे सर्वात मोठे कारण हे आहे की, यामध्ये कमी व्याजदरावर सहज लोन मिळू शकते. पंजाब अँड सिंध बँक 7% दराने कर्ज देत आहे. जर तुम्हालाही गोल्ड लोन घ्यायचे असेल तर तुम्हाला सर्व बँक आणि NBFC व्याजदराविषयी माहिती घ्यायला हवी. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, कोणती बँक आणि NBFC कोणत्या व्याजाच्या आधारावर लोन देत आहे.

कोणती बँक कोणत्या दरावर देत आहे कर्ज

Bankव्याजदर (%)जास्तीत जास्त कर्जाची रक्कम (रुपयांमध्ये)कालावधी (महिन्यामध्ये)
पंजाब अँड सिंध बँक7-7.501 कोटी36
यूनियन बँक ऑफ इंडिया7.2025 लाख36
बँक ऑफ इंडिया7.351 कोटी18
SBI7.5050 लाखांपर्यंत36
केनरा बँक7.6520 लाख12
पंजाब नेशनल बँक8.7525 लाख12
IIFL फायनान्स9.24-243 हजारांपासून सुरू36
मन्नापुरम फायनान्स12-291.5 कोटी12
मूथूट फायनान्स27 पर्यंत1.5 हजारांपासून सुरू36

गोल्ड लोनसंबंधीत खास गोष्टी
यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर पाहिला जात नाही

गोल्ड लोन एक प्रकारचे सिक्योर्ड लोन आहे. यामुळे यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोअर लक्षात घेतला जात नाही. हे लोन तुम्हाला पर्सनल लोनच्या तुलनेत सहज आणि कमी व्याजावर मिळते.

आपल्या हिशोबाने निवडा रीपेमेंट ऑप्शन
बँक किंवा एनबीएफसी आपल्याला कर्जाची रक्कम आणि व्याज परतफेड करण्यासाठी अनेक पर्याय देते, आपण आपल्या गरजेनुसार कोणताही एक निवडू शकता. आपण समान मासिक हप्त्यांमध्ये (EMI) देय देऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही एकरकमी मुदतीच्या पेमेंट दरम्यान व्याजही देऊ शकता. याला बुलेट रीपेमेंट असे म्हणतात आणि बँका मासिक आधारावर व्याज घेतात.

तुमच्या हिशोबाने निवडू शकता कर्जाचा कालावधी
सामान्यतः बँक आणि NBFC 12 ते 36 महिन्याच्या कालावधीसाठी कर्ज देतात. अशा वेळी तुम्ही गरजेनुसार 12 ते 36 महिन्यांसाठी लोन घेऊ शकता.

बातम्या आणखी आहेत...