आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gold May Become Expensive During The Festive Season, Suppliers Are Sending Gold Shipments To India, China, Turkey

चिंताजनक:सणासुदीच्या काळात महाग होऊ शकते सोने, पुरवठादार भारत चीन, तुर्कस्तानला सोन्याची शिपमेंट पाठवतोय

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांत सोन्याचे भाव खाली आले असले तरी त्यात तेजीची बीजे रोवली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतात सोन्याचा पुरवठा कमी झाला आहे. भारतात सोने आयात करणाऱ्या प्रमुख एजन्सी आयसीबीसी स्टँडर्ड बँक, जेपी मॉर्गन आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक दरवर्षी सणांच्या काळात अधिक सोने आयात करतात. पण या वर्षी या बँकांनी भारतात येणाऱ्या शिपमेंटमध्ये कपात केली आहे आणि ती चीन, तुर्की आणि इतर देशांमध्ये पाठवली आहेत जिथे त्यांना जास्त किंमत मिळत आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या बँकांच्या तिजोरीत १०% पेक्षा कमी सोने शिल्लक आहे. मुंबईतील वॉल्ट अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या तिजोरींमध्ये सामान्यतः बँकांमधून अनेक टन सोने ठेवले जाते; परंतु सध्या ते फक्त काही किलो आहे. बँकांच्या या निर्णयामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची बाजारपेठ असलेल्या भारतात सणासुदीच्या काळात सोन्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे येत्या सीझनमध्ये खरेदीदारांना मोठा प्रीमियम भरावा लागू शकतो. त्यामुळे धनत्रयोदशी, दिवाळी आणि लग्नासाठी सोने खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात.

भारताऐवजी चीन, तुर्कस्तानला यामुळे वाढला सोन्याचा पुरवठा केडिया अॅडव्हायझरी ग्रुपचे संचालक अजय केडिया म्हणाले की, भारतीय घाऊक विक्रेते सध्या सोन्यावर १-२ डॉलर प्रति औंस प्रीमियम भरत आहेत. दुसरीकडे, हाच प्रीमियम चीनमध्ये २५-३० डॉलर आणि तुर्कीमध्ये ८० डॉलरपर्यंत आहे. यामुळेच बँकांनी भारताचे सोने या देशांमध्ये पाठवले आहे. सणांच्या काळात मागणी वाढल्यामुळे, भारतातील घाऊक विक्रेते देखील ८-१० डॉलरचा प्रीमियम भरून सोने खरेदी करतील आणि ते ग्राहकांकडून वसूल करतील.

देशातील १६ बँकांना सोने आयातीची परवानगी अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, एचडीएफसी, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, आयसीआयसीआय, इंडसइंड, इंडियन ओव्हरसीज बँक, कोटक महिंद्रा, करूर वैश्य बँक, पीएनबी, आरबीएल, एसबीआय, यूनियन बँक अाणि यस बँक.

सहामाहीत १६% आयातीत घट मुदत आयात एप्रिल-सप्टेंबर २२ १६४.६६ एप्रिल-सप्टेंबर २१ १९६.०६

गेल्या महिन्यात २८% कमी उत्पन्न सप्टेंबर २०२२ २९.८ सप्टेंबर २०२१ ४१.७१ (आयात लाख कोटी रुपयांत)

एका दिवसात सोने ८९९ रु. महाग तारीख १० ग्रॅम किंमत ३ ऑक्टोबर ५०,३८७ ४ ऑक्टोबर ५१,२८६ (२४ कॅरेट सोन्याचा भाव रुपयांत, दर ५ ऑक्टोबरला भाव आले नाहीत)

बातम्या आणखी आहेत...