आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gold Robbery Udaypur | Marathi News | Robbery Of Old People Using Fake Biscuits Of Saina; More Than 12 Cases Of Fraud In Several States

वृद्ध ठक:साेन्याची नकली बिस्किटे वापरून वृद्धांची लूट; अनेक राज्यांत 12 हून जास्त फसवणुकीच्या घटना

उदयपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानातील उदयपूरमध्ये दाेन वृद्ध ठकांना अटक करण्यात आली आहे. नकली साेन्याच्या माध्यमातून वृद्ध ठक वृद्धांनाच फसवण्याचे काम करायचे. अर्जुन प्रसाद (७३) व नवलकुमार (६६) अशी या ठकांची नावे आहेत. अर्जुन प्रसाद मूळचा झारखंडच्या जामताडा येथील रहिवासी आहे. नवलकुमार बिहारच्या नवादा मिर्झापूरचा आहे. वृद्धाजवळ आधी नकली साेन्याचे बिस्किट फेकून द्यायचे. त्यानंतर ते वृद्धाला साेने सापडल्याचे सांगायचे. एवढ्यात त्याचा साथीदार ठक तेथे येऊन हे साेने अस्सल असल्याचा दावा करून टाकायचा.

मग हा ठक स्वत:ला मूलबाळ नसल्याची बतावणी करायचा. म्हणून एवढे साेने घेऊन करायचे काय? तुम्हाला हवे असल्यास हे बिस्किट तुम्ही ठेवून घ्या. त्याच्या बदल्यात साधी काही वस्तू किंवा पैसे असल्यास द्यावे, असे ताे सांगायचा. ठकाच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीकडून पैसे मिळताच दाेघेही पाेबारा करायचे. अर्जुनला अपत्य नाही. दाेघांनाही नातेवाईक व मुले सहकार्य करत नाहीत. त्यामुळेच दाेघे एकत्र आले.

पाेलिस अधीक्षक मनाेजकुमार चाैधरी म्हणाले, दाेघेही एका शहरात फसवणूक केल्यानंतर दुसऱ्या शहरात निघून जात. पाेलिसांच्या जाळ्यात सापडू नये, असे त्यांना वाटे. ताब्यात घेतलेल्या या ठकांची कसून चाैकशी करण्यात आली. या आराेपींनी पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, राजस्थानमध्ये १२ हून जास्त जणांची फसवणूक केल्याची कबुली दिली. दाेन्ही आराेपी धर्मशाळेत उतरले हाेते. त्यांचे वय पाहून ते आराेपी असतील, असा साधा संशयही कुणाला येणार नाही. दाेघांनी तीन दिवसांत उदयपूरमध्ये दाेन महिलांकडून साेन्याची अंगठी व कानातील दागिने, साेन्याचे मंगळसूत्र लांबवले हाेते.

बातम्या आणखी आहेत...