आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gold silver, Palm Oil Can Be Expensive; Increase In Minimum Import Price By 62 Dollars

उत्पादने स्वस्त होऊ शकतात:सोने-चांदी, पाम ऑइल होऊ शकते महाग; किमान आयात किमतीत 62 डॉलरची वाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढत्या किमतीमुळे सरकारने सोने-चांदी आणि पाम ऑयलच्या किमान आयात किमती (बीआयपी) ६२ डॉलर म्हणजेच ५,१२४ रुपये प्रति टनपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात त्यांच्या किमती वाढु शकतात. स्वस्त पामतेलाची आयात वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून देशांतर्गत बाजारात खाद्यतेल आणि त्यासंबंधित वस्तूंच्या किमती कमी होत्या. मात्र आता त्यात वाढ होऊ शकते. तथापि, सरकारने साबण, वॉशिंग पावडर, मेणबत्त्या, स्वच्छता उत्पादने आणि वैयक्तिक काळजी उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या आरबीडी पामोलिन आणि क्रूड सोया तेलाच्या किमान आयात किमती कमी केल्या आहेत.

किमान आयात किंमतीनुसार शुल्क-कर जागतिक बाजारात पाम तेल आणि सोने-चांदीच्या किमतीत उसळी आल्यानंतर भारतीय आयातदारांवर दबाव वाढतो. सरकार देशांतर्गत बाजारात किमतीं जागतिक बाजारानुसार ठेवण्यासाठी प्रत्येक १५ दिवसात न्यूनतम आयात मुल्यांची समीक्षा करत असते. सरकार किमान आयात किमतीच्या आधारे शुल्क आणि कर लावते. भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार तर चांदीचा सर्वात मोठा आयातदार आहे.

बातम्या आणखी आहेत...