आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी बँक, रुग्णालयांसह अनेक भागात 21 हजार रिक्त जागा:8 वी, 12 वी, एमबीबीएस आणि पदवीधरांना सुवर्णसंधी; 25 ते 81 हजार पगार

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. देशातील अनेक राज्यांसह भारतीय स्तरावर 21 हजारांहून अधिक पदांवर सरकारी नोकरीसाठी जागा निघाल्या आहेत. यामध्ये एएनएम, बँक पीओ, रेंजिडेंट, अप्रेंटिस, असिस्टंट या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी 8 वी, 10 वी, 12 वी, पदवीधर, एमबीबीएस, एमडीएस या पात्रता आवश्यक आहे. तसेच पात्र उमेदवारांनी योग्य वेळेत अर्ज करणे गरजेचे आहे. जाणून घ्या आणखीन पोस्टबद्दल.

एएनएम साठी 10 हजारांहून अधिक पदे, 28 हजार पगार

बिहारमध्ये 12,771 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी 2 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच पात्र उमेदवार https://btsc.bih.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 1 सप्टेंबर 2022 आहे. या भरतीसाठी राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी विविध स्तरावर नियुक्त्या केल्या जातात. यामध्ये बिहार महिला आरोग्य कर्मचाऱ्यांची (ANM) 10709 पदे पुनर्स्थापित केली जातात. त्याचबरोबर एक्स-रे, टेक्निशियनच्या 803 पदे, ओटी असिस्टंटच्या 1096 पदे आणि ईसीजी टेक्निशियनच्या 163 पदांवरही नियुक्ती करण्यात येणार आहे.

अर्ज फी आणि वयोमर्यादा

जनरल - OBC/EWS:रु. 200/- SC/ST:रु. 50/- दिव्यांग / महिला : रु.50/- पुरुषांसाठी कमाल वय 37 वर्षे आणि महिलांसाठी 40 वर्षे असे आहे. वयाची गणना 1 जानेवारी 2022 नुसार केली जाईल.

सरकारी बँकेमध्ये मेगा भरती, पीओसाठी 6432 जागा, 71 हजार पगार

आयबीपीएस म्हणजेच Institute of Banking Personnel Selection ने देशभरातील सरकारी बँकेमध्ये पीओची पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. यासाठी विशेष 6432 रिक्त पदांसाठी ऑनालाईल भरती प्रक्रिया 2 ऑगस्ट म्हणजे मंगळवारपासून सुरु केली आहे. तसेच ही प्रक्रिया 22 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यासाठी पात्र उमेदवाराने आयबीपीएस च्या अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

आयबीपीएस पीओची भरती परीक्षा ऑक्टोबर 2022 मध्ये घेण्यात येणार आहे. आयबीपीएस परीक्षेच्या वेळापत्रकानुसार पीओची भरती परीक्षा 2022 मध्ये होईल. यासाठी जे पात्र उमेदवार असतील त्यांना आयबीपीएस पीओच्या भरती पुर्व परीक्षेत पात्र ठरतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. तसेच ही मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात येईल.

पीओच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण उमेदवाराचे वय 20 ते 30 वर्ष असावे. तसेच राखीव श्रेणीतील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. जोवर वयाचा संबंध येत नाही त्याला 1 ऑगस्ट 2022 पर्यंत निर्धारीत करण्यात येईल. तसेच किमान शैक्षणिक पात्रता म्हणून उमेदवाराने मान्याताप्राप्त संस्थेतून त्याला कोणत्याही विषयाची पदवी असणे अत्यंत आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा https://ibpsonline.ibps.in/crppo12jul22/
अधिकृत संपूर्ण अधिसूचनेसाठी येथे क्लिक करा

234 रिक्त जागा, मुलाखतीद्वारे होणार योग्य उमेदवाराची निवड, 45 वर्षांचे उमेदवार करू शकतात अर्ज

पंडित भागवत दयाल शर्मा युनिर्व्हसिटी ऑफ हेल्थ सायन्स, रोहतक यांनी 234 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केल्या आहेत. या अंतर्गत वरिष्ठ निवासी आणि प्रात्यक्षिकांच्या विविध पदांवर भरती करण्यात येत आहे. यासाठी इच्छूक पात्र उमेदवारांनी या पदासाठी ऑफलाईन अर्ज पाठवू शकतात. या पदासाठी उर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट आहे.

या पदांसाठी अर्ज पाठवण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये असा अर्ज शुल्क आकारण्यात आला आहे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. तर सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांना शुल्कात 50 टक्के सूट मिळेल. यासाठी उमेदवाराचे वय किमान 22 वर्ष तर कमाल 45 वर्ष असावे. SC/ST/OBC/PWD/PH या श्रेणीतील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.

नोकरीचे ठिकाण - रोहतक, हरियाणा

पात्रता आवश्यकता वरिष्ठ रहिवासी: MBBS/MD/MS/DNB डिमॉन्स्ट्रेटर : एमबीबीएस सीनियर रेजिडेंट डेंटल: MDS किंवा त्याच्या समतुल्य

अर्ज पाठवण्याचा पत्ता: अर्ज भरल्यानंतर, सर्व आवश्यक असलेले कागदपत्रे एका लिफाफ्यात ठेवा आणि त्यावर पदासाठी अर्ज लिहा. यानंतर दिलेला पत्ता O/O उपनिबंधक, Rectt. आणि स्थापना. शाखा, पं. बीडी शर्मा, यूएचएस, रोहतक हरियाणा” इंडिया पोस्टद्वारे.

पगार आणि निवडक प्रक्रिया: निवडलेल्या उमेदवारांना 67,700/- + 13,540/- पगार दिला जाईल, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

मिनी रत्न कंपनीत 396 रिक्त जागा, फक्त 8वी ते पदवीधरांना संधी

आठवी पास ते पदवीधर झालेल्या तरुणांना मोठी संधी चालून आली आहे. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL), भारत सरकारच्या मिनी रत्न कंपनीने एकूण 396 पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार RCFL च्या अधिकृत वेबसाइट www.rcfltd.com/ वर जाऊन 14 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात.

RCFL ने लेखा कार्यकारी, सचिव सहाय्यक, केमिकल/सिव्हिल/संगणक/इलेक्ट्रिकल/अटेंडंट ऑपरेटर, बॉयलर ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, हॉर्टिकल्चरिस्ट यासह ट्रेड टेक्निशियन आणि पदवीधर अप्रेंटिस आणि इतर पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर केल्या आहेत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा https://ors.rcfltd.com/3054/Position/APTREC-2022/ORS/
अधिकृत संपूर्ण अधिसूचनेसाठी येथे क्लिक करा https://www.rcfltd.com/files/Apprentice%20Advt%202022.pdf

10 वी, 12 वी, पदवीधरांसाठी अनेक रिक्त जागा, 48 वर्षांचे उमेदवार करु शकतात अर्ज

जम्मू काश्मीर सेवा निवड मंडळ (JKSSB) ने विविध सरकारी विभागांमध्ये 772 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केल्या आहेत. या अंतर्गत सहाय्यक, संगणक सहाय्यक, निरीक्षक, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर, भाडे जिल्हाधिकारी आणि इतर पदांसाठी भरती केली जाईल. अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ऑगस्टपासून सुरू होणार असून, 14 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पात्र उमेदवार https://jkssb.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

JKSSB च्या या पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा श्रेणीनुसार निश्चित केली आहे. अनारक्षित प्रवर्गासाठी 40 वर्षे तर आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादा 43 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. या पदांसाठी वयाच्या 48 वर्षापर्यंत उमेदवार अर्ज करू शकतील.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य उमेदवारांना 550 रुपये शुल्क आकरण्यात आला आहे. तर SC/ST, PWD आणि EWS श्रेणींना 450 रुपये अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागेल. याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंग वर क्लिक करा.

https://jkssb.nic.in/Pdf/advt_04_of_2022_-_below_Level-6__1_%20final_27072022.pdf

बातम्या आणखी आहेत...