आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रायने 20 शहरांत तपासली नेटवर्कची गुणवत्ता:कोटात कॉल सर्व्हिस चांगली, वडोदरात व्हिडिओ स्ट्रीमिंग टाॅपवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दूरसंचार नियामक ट्रायने दूरसंचार कंपन्यांचा कॉल आणि डेटा सर्व्हिसच्या गुणवत्तेबाबत २० शहरांत पाहणी केली. त्याच्या अहवालावर भास्करने यापैकी उ.भारतातील १३ शहरे आणि हायवेवर जारी अहवालाचे विश्लेषण केले. जिओची कॉल सेवा सर्वोत्कृष्ट ठरली. डेटा सर्व्हिसबाबत एअरटेल आणि व्होडाफोनपेक्षा जिओ मागे राहिले.व्होडाफोनच्या 4जी नेटवर्कने दुर्ग-भिलाईहून जगदलपूर हायवेत सर्वाधिक २३.७१ एमबीपीएसची स्पीड दिली. अपलोडिंग स्पीडही सर्वात जास्त २८.७१ एमबीपीएस व्होडाफोनच्या 4जी नेटवर्कवर वडोदरात मिळाली. टेस्टिंगमध्ये वडोदरात व्होडाफोनच्या नेटवर्कचा सर्वात चांगला अनुभव मिळाला. तेथे बफर वेळ सर्वात कमी ०.०४ सेकंद राहिला.

जिओत कॉल ड्रॉप-कॉल ब्लॉक शून्य कॉल ड्रॉप : एअरटेल, व्होडाफोन, जिओची 4जी व बीएसएनएलची 3जी-4जी सेवांमध्ये सर्वात जास्त कॉलड्रॉप बीएसएनएलमध्ये झाली. कोटा वगळता सर्व शहरांत कॉल ड्रॉप झाले. रांची-डॉल्टनगंज हायवेत २.९८% कॉलमध्येच कापले गेले. खराब सेवेत व्होडाफोन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. वडोदरामध्ये सर्वाधिक १.४६% कॉल ड्रॉप झाले.

व्हिडिओ स्ट्रीमिंग : 4जीमध्ये एअरटेलचा व्हिडिओत बफरिंग वेळ सर्वात कमी राहिला. वडोदरात व्होडाफोनच्या नेटवर्कवर व्हिडिओ स्ट्रीमिंग बफरिंग टाइम केवळ ०.०४ सेकंद राहिला. कॉल ब्लॉक : सर्वात जास्त कॉल ब्लॉक बीएसएनएलचे झाले. हे सर्वात जास्त गोरखपूरमध्ये(१.९३%) झाले. व्होडाफोन कॉल ब्लॉकमध्येही दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

बातम्या आणखी आहेत...