आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Good New Year Has So Far Attracted 1 Crore Tourists, One Thousand Crore Business; 90 Percent Hotel Book, Waiting For Peak Season

गुड न्यूज:हिमाचल प्रदेशात पर्यटन व्यवसायात विक्रमाची आशा, यावर्षी आतापर्यंत 1 कोटी पर्यटक दाखल

हिमाचलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशातील पर्यटन व्यवसाय या वर्षी नवे विक्रम बनवण्याच्या बेतात आहे. आतापर्यंत १ कोटीहून जास्त पर्यटक पर्यटनासाठी येऊन गेले आहेत. अजून पीक सीझन (जून महिना) यायचा आहे. त्यासाठी बुकिंग सुरू आहे. ९० टक्के हॉटेल आणि होम स्टे बुक झाले आहेत.

या वर्षी आतापर्यंत १ हजार कोटींचा व्यवसाय झाला आहे. जुलै-ऑगस्टमध्ये परदेशी पर्यटकही येतील. पर्यटनाशी निगडित लोकांचे म्हणणे असे की, यंदा पर्यटकांचा आकडा २०१९ (कोरोनापू्र्व) वर्षालाही मागे टाकेल. तेव्हा राज्यात १.७२ कोटी पर्यटक आले होते. राज्याच्या महसुलात पर्यटनाचे योगदान ७.१ टक्के इतके आहे. राज्य सरकारच्या खात्यात दरवर्षी त्यामुळे १२० कोटी रुपये जमा होतात. हॉटेल असोसिएशनचे (मनाली) प्रमुख मुकेश ठाकूर यांचे म्हणणे आहे की, आता वीकेंडला गर्दी चांगली आहे.

जूनमध्ये येथे भरपूर पर्यटक येतील. आता येथे ९० टक्के हॉटेल आधीच बुक झाले आहेत. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत १०० टक्के हॉटेल बुक होतील. हॉटेल असोसिएशन धर्मशाळाचे प्रमुख अश्वनीकुमार बाबा यांनी सांगितले की, आता वीकेंडला ९५ टक्के हॉटेल बुक आहेत. जून महिन्यात दरवर्षी व्यवसाय चांगला होतो. होम स्टे आणि हॉटेलची ९० टक्के अ‍ॅडव्हॉन्स बुकिंग झाली आहे. बाबा यांचे म्हणणे असे की, मोठ्या संख्येत पर्यटक केवळ धार्मिक स्थळे पाहूनच परत जातात. त्यांना अधिक माहिती देण्याची गरज आहे. त्यामुळे ते राज्यातील इतर पर्यटनस्थळांनाही भेटी देतील. अधिक काळ राज्यात वास्तव्य करतील.

अर्थशास्त्र तसेच सांख्यिकी विभागाचे डायरेक्टर अनुपम शर्मा यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशात दरवर्षी हॉटेल तसेच रेस्टॉरंटचा व्यवसाय हा १७०० कोटी रुपयांचा असतो. या वर्षी जूनपर्यंतच हा आकडा १ हजार कोटींवर पोहोचला आहे. पर्यटन व्यवसायाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडलेल्या ५.५ लाख लोकांसाठी ही चांगली बातमी आहे. त्यात १३१४ गाइड, २९१२ ट्रॅव्हल एजन्सी, ८९९ छायाचित्रकारांचा समावेश आहे.

अटल टनलमुळे वर्षभर बर्फाळ नजाऱ्यांची अनुभूती
पीर पंजालच्या डोंगरांवरील ९.२ किमी लांब अटल टनल पर्यटकांची पहिली पसंत होय. २०२० मध्ये प्रारंभापासून अॉक्टोबर ते डिसेंबरपर्यंत १.४ लाख, २०२१ मध्ये सुमारे ८ लाख पर्यटक येथे आले होते. या वर्षी आतापर्यंत ३.०७ लाख येऊन गेले. पर्यटक अजूनही येत आहेत. त्याशिवाय सिमला, कुल्लू-मनाली आणि कांगडा ही आधीपासूनच पर्यटकांची आवडती स्थळे आहेत.

बातम्या आणखी आहेत...