आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात रोजगाराबाबत ५०% पेक्षा जास्त भागीदारी असलेल्या सेवा क्षेत्रातून आनंदाची बातमी आहे. अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी करत डिसेंबर २०२२ मध्ये हे क्षेत्र ६ महिन्यांत सर्वात वेगाने धावले व सर्वोच्च पातळीवर पोहोचले. क्षेत्राचा पीएमआय नोव्हेंबरमध्ये ५६.४ होता. तो डिसेंबर २०२२ मध्ये वाढून ५८.५ झाला. बाजार विश्लेषकांनी तो ५५.५ राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. यापूर्वी ३८ टक्के जॉब देणाऱ्या खासगी क्षेत्राचे उत्पादनही सुमारे ११ वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते. मॅन्युफॅक्चरिंगचा कंपोझिट इंडेक्स डिसेंबरमध्ये ५९.४ होता. तो जानेवारी २०१२ नंतर सर्वोच्च होता.
एसअँडपी ग्लोबलनुसार, सेवा क्षेत्रामध्ये पीएमआय (पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स) १७व्या महिन्यात ५० च्या वर राहिला. ही जून २०१३ नंतर सर्वात चांगली स्थिती आहे. उत्पादन क्षेत्राचा दृष्टिकोनही सकारात्मक राहिला. यामुळेच उत्पादन १३ महिन्यांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले.
यामुळे वाढल्या अपेक्षा... :
{इंडिया रेटिंग अँड रिसर्चनुसार, आगामी काळात सेवा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढेल. ती एप्रिल २००० ते मार्च २०१४ दरम्यान ६.५२ लाख कोटी रुपये होती. नंतर एप्रिल २०१४ ते मार्च २०२२ मध्ये १२.३९ लाख कोटी झाली. याचदरम्यान मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विदेशी गुंतवणूक ६.२४ लाख कोटींनी वाढून ७.६३ लाख कोटी रुपये झाली.
{टीमलीजच्या ‘एम्प्लॉयमेंट आउटलुक’ अहवालानुसार, सेवा क्षेत्रातील ७७% कंपन्या जानेवारी ते मार्च २०२३ मध्ये नव्या नोकऱ्या देण्याचा विचार करत आहेत.
{एमएसएमई बिझनेस कॉन्फिडन्स स्टडीनुसार, देशातील ९६% एमएसएमईला २०२३ मध्ये आपला नफा ३०% वाढण्याची आशा आहे. तसेच या वर्षी कंझ्युमर डिमांड वाढण्याचीही त्यांना अपेक्षा आहे.
हे आहे कारण... इनपुट खर्च वाढल्याने बहुतांश ग्राहक सेवा प्रभावित झाल्या. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात आर्थिक व विमा सेवांचे शुल्क वाढूनही यात वाढ झाली.
{गेल्या दोन वर्षांत कारखान्यांना सर्वाधिक कंत्राट डिसेंबरमध्येच मिळाले आहेत. त्यांचे उत्पादनही सर्वाधिक राहिले. यामुळेच पीएमआय आकडे वाढले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.