आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Good News In Corona Period | Car Sales Tripled, Unemployment Halved; GST Recovery As Like 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळात सुवार्ता:कारविक्री तिप्पट, बेरोजगारी निम्म्यावर; जीएसटी वसुली 2019 इतकी

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाॅकडाऊनमध्ये ठप्प झालेले आर्थिक व्यवहार सुरू झाल्याने जूनच्या आकडेवारीत वेगवान सुधारणा

देशाला आर्थिक आघाड्यांवर बुधवारी सुवार्ता मिळाल्या. सर्वात मोठा दिलासा जीएसटी वसुलीच्या रूपाने मिळाला. जूनमध्ये करवसुली वाढून ९० हजार कोटी रुपयांवर गेली. दुसरीकडे, मेच्या तुलनेत कार विक्री तिपटीने वाढली आहे. बेरोजगारीचा दरही मेच्या तुलनेत निम्म्याने घटून ११% वर आला आहे. याशिवाय मॅन्युफॅक्चरिंगची पातळी दर्शवणारा पीएमआय इंडेक्सही जवळपास पूर्वस्थितीवर आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जूनमध्ये ९०,९१७ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला, तो गतवर्षीच्या जूनमधील एकूण जीएसटीच्या ९१% इतका आहे. गेल्या दोन महिन्यांची आकडेवारी पाहता त्यात चांगली सुधारणा झाली आहे. गेल्या काही महिन्यांत कोरोना व लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार ठाप्प होते. ते आता पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

1. जीएसटी वसुली : एप्रिलच्या तुलनेत तिपटीवर

डेलॉयट इंडियाचे भागीदार एम.एस. मणी म्हणाले, जीएसटीत मोठ्या घसरणीची शंका होती. मात्र, जूनची जीएसटी वसुली चांगल्या रिकव्हरीचे संकेत देत आहे.

2. कार : जूनमध्ये 1.16 लाख विक्री, पण गतवर्षापेक्षा निम्मी

वाहन डिलर्स संघटना फाडाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये कारची विक्रमी मे महिन्याच्या तुलनेत ितप्पट वाढली. मात्र गतवर्षीचे आकडे पाहिले तर जून २०१९ च्या तुलनेत जून २०२० मध्ये वाहनांची विक्री सुमारे ५३.९० टक्क्यांनी घटली आहे.

3. रोजगार : बेरोजगारी दर 23.5% वरून 11% वर

जूनमध्ये देशात बेरोजगारी दर ११%, तर मेमध्ये २३.५% होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार, लाॅकडाऊननंतर आर्थिक व्यवहार पुन्हा रुळावर आले आहेत. यामुळे बेरोजगारी दर घटला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील सर्वात वाईट काळ आता शक्यतो संपला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

4. मॅन्युफॅक्चरिंग : निर्देशांक 30.8 वरून 47.2 वर

जूनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातही सुधारणा झाली आहे. आयएचएस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) जूनमध्ये ४७.२ वर गेला. हा निर्देशांक मेमध्ये ३०.८ होता. निर्देशांक ५० वर राहण्याचा अर्थ घडामोडींत वाढ होत आहे. तो ५० पेक्षा कमी असल्यास आकुंचन दर्शवतो. आयएचएस मार्केटचे अर्थतज्ज्ञ इलियाॅट केर म्हणाले, जूनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र स्थैर्याकडे वाटचाल करत आहे.

.... यामुळे वाढली जीएसटीची वसुली

काही आठवड्यांत फार्मा व एफएमसीजी कंप​न्यांनी चांगलीच विक्री नोंदवली आहे. जीएसटीतील सर्वात मोठी वसुली याच दोन क्षेत्रांमधून आली आहे.

५ कोटींपेक्षा जास्त उलाढालीच्या कंपन्यांना फेब्रुवारी-मार्च-एप्रिलचा कर भरण्यासाठी २४ जूनपर्यंतची मुदत मिळाली होती. काहींनी जूनमध्ये बॅकलॉग भरला आहे.

यापुढेही करवसुली आणखी वाढणार

चार्टर्ड अकाउंटंट विकास अग्रवाल यांच्यानुसार, ५ कोटींपेक्षा कमी उलाढालीच्या कंपन्यांसाठी जीएसटी भरण्याची मुदत सप्टेंबरपर्यंत आहे. यामुळे आता आणखी सुमारे १०% जीएसटी वाढणार आहे.

बातम्या आणखी आहेत...