आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Good News On The Vaccine; From May 1, Everyone Over The Age Of 18 Will Be Able To Get The Corona Vaccine

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोठी बातमी:1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लस घेण्यासाठी कोविन अॅपवरुन रजिस्ट्रेशन करावे लागणार

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार आहे. याशिवाय, व्हॅक्सीन तयार करणाऱ्या कंपन्या आपला 50% पुरवठा केंद्राला करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तर, इतर 50% पुरवठा राज्य सरकारांना किंवा ओपन मार्केटमध्ये देता येईल. लसीकरणासाठी कोविनद्वारे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

आतापर्यंत 45 वर्षांवरील व्यक्तींनाच कोरोना लस दिली जात होती. देशभरातील 12.38 कोटी लोकांनी कोरोनाचा पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे. सरकारकडून सोमवारी जारी आदेशानुसार, आठरा पेक्षा जास्त वय असलेल्यांना 1 मे 2021 पासून लस दिली जाईल.

कंपन्या 50 टक्के लस केंद्राला देणार

सरकारने व्हॅक्सीन तयार करणाऱ्या कंपन्यांना सांगितले आहे की, फेज-3 मध्ये कंपन्या महिन्याला तयार होणाऱ्या 50% केंद्राला देतील. उर्वरित 50% लसीचा साठा राज्य सरकार आणि ओपन मार्केटमध्ये विकू शकतात.

केंद्र क्रायटेरिया ठरवून राज्यांना लस देणार

केंद्र सरकार लसीच्या आपल्या 50% कोट्यातून क्रायटेरिया ठरवेल आणि त्यानुसार, सर्वात प्रभावित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लस सप्लाय करेल. व्हॅक्सीनच्या वेस्टेजवर राज्यांची निगेटीव्ह मार्किंगदेखील केली जाईल.

पहिला डोज घेणाऱ्यांना प्राथमिकता

व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सना व्हॅक्सीनेशमध्ये प्राथमिकता दिली जाईल. व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना प्राथमिकता दिली जाईल. यासाठी संपूर्ण आराखडा तयार केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...