आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनभद्रमध्ये मालगाडीचे तुटले कपलिंग:मालगाडी जवळपास 2 कि.मी. गेली पुढे, 45 मिनिटे रेल्वे वाहतूक विस्कळीत

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चोपणहून चुनारकडे जाणाऱ्या मालगाडीचे खैराही रेल्वे स्थानकाजवळ कपलिंग अचानक तुटले आणि रेल्वेचे दोन भाग झाले. गार्डसह चार डबे मागे राहिले तर इंजिनसह उर्वरित डबे 2 किमी पुढे निघून गेल्याची घटना घटली. याचा रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. मात्र, वेळीच सुधारणा केल्याने रेल्वे वाहतूक लवकरच पूर्ववत झाली.

मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याचे गार्ड आणि चालक दोघांच्या लक्षात आले नाही. गार्डला गाडी थांबली आहे, असे वाटले. यावर गार्डने वॉकी टॉकीवरून लोको पायलटला मालगाडी थांबवण्याचे कारण विचारले. तेव्हा ड्रायव्हर अवाक झाला. त्यावर चालकाने गाडी सुरुच असल्याचे सांगितले. पण, आपला डबा थांबल्याचे गार्डने चालकाला सांगितले. यानंतर मालगाडी थांबवून पाहिले असता कपलिंग तुटून काही डबे मागेच राहिल्याचे चालकाच्या लक्षात आले. यानंतर मालगाडी चालकाने खैराही रेल्वे स्टेशन मास्तरकडून लाईन क्लिअर घेतली. यानंतर परत येत डबे जोडले आणि गाडी मार्गस्थ झाली.

45 मिनिटे रेल्वे वाहतूक विस्कळीत

या संपूर्ण घटनेत सुमारे 45 मिनिटे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. यादरम्यान खैरही रेल्वे क्रॉसिंगवरून येणाऱ्या नागरिकांना सुमारे 45 मिनिटे मालगाडी उभी राहिल्याने मोठा त्रास सहन करावा लागला. यादरम्यान रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हा प्रकार कशामुळे घडला? हे मात्र समजू शकले नाही. वेगाने जाणाऱ्या गाडीचे ट्रेन पार्किंग झालेच कसे? रेल्वे गाड्यांची व्यवस्थित तपासणी केली जात नाही का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...