आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गूगल फॉर इंडिया इव्हेंट:गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान मोदींशी केली व्हर्च्युअल मीटिंग, भारतात 75,000 कोटींची गुंतवणूक करणार कंपनी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी पिचाईसोबत डेटा सुरक्षा आणि सायबर सुरक्षेच्या महत्वाबाबत केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासोबत आज व्हर्च्युअल मीटिंग ((व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) केली. पंतप्रधानांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. तसेच गुगल भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचेही सांगितले. 

मोदींने ट्विट करत लिहिले की, "आज सकाळी सुंदर पिचाई यांच्यासोबत यशस्वी चर्चा झाली. आम्ही भारतातील शेतकरी, तरुण आणि उद्योजकांचे जीवन बदलण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासह अनेक विषयांवर चर्चा केली."

पीएम मोदींनी ट्विट केले की, मला गुगलद्वारे अनेक क्षेत्रांत विशेषत: शिक्षण, लर्निंग, डिजिटल इंडिया, डिजिटल पेमेंट क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कामांबाबत कळाले.

पीएम मोदींनी लिहिले की, "सुंदर पिचाई यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मी कोरोनाच्या काळात निर्माण झालेल्या नवीन कार्यसंस्कृतीविषयी चर्चा केली. खेळाच्यासारख्या क्षेत्रात जागतिक साथीने आणलेल्या आव्हानांवर आम्ही चर्चा केली. आम्ही डेटा सुरक्षा आणि सायबर सुरक्षा महत्त्व बद्दल देखील बोललो."

परदेशी कंपन्यांना गुंतवणूकीसाठी दरवाजे खुले असतील

मोदींनी अलिकडेच एका ग्लोबल इव्हेंटमध्ये म्हटले होते की, भारत सर्व आंतरराष्ट्रीय कंपन्यासाठी दरवाजे खुले करत आहे. इतर अनेक देशांच्या तुलनेत भारत गुंतवणूकीसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. स्वावलंबी भारत योजना ही देशाच्या स्वयंपूर्णतेसाठी आहे, परदेशी गुंतवणूकदारांना बंद करण्याच्या बाबतीत नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले होते.

गूगल 75,000 कोटींची गुंतवणूक करेल

गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, भारताच्या डिजिटायझेशनसाठी गूगल अनेक घोषणा करण्यासाठी उत्सुक आहे. आम्ही भारतात पुढील 5-7 वर्षांत 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. ही गुंतवणूक इक्विटी गुंतवणूक, भागीदारी आणि परिचालन पायाभूत सुविधांद्वारे केली जाईल.

0