आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआयफोननंतर गुगलचा पिक्सल फोनदेखील भारतात बनू शकतो, अशी चर्चा आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई या महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी केंद्र सरकार याविषयावर पिचाई यांच्याशी चर्चा करणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णवने सांगितले, ‘सुंदर पिचाई यांच्या भेटीदरम्यान अनेक मुद्द्यावर चर्चा होणार आहे. त्यावेळी मोबाइल फोनच्या मॅन्युफॅक्चरिंगवरही चर्चा करण्यात येणार आहे.
यात प्रमुख मुद्दा भारतात गुगलचे पिक्सल फोनची मॅन्युफॅक्चरिंग सुरु करण्याचा राहिल. याशिवाय आम्ही अॅप डेवलपर इकोसिस्टम विकसित करणे, सायबर सिक्युरिटी आणि भारतीय भाषेच्या वापरावरदेखील चर्चा करणार आहोत. सूत्रांनी सांगितले की, गुगल भारताला निर्यात-केंद्रित उत्पादन केंद्र म्हणून वापरणारी तिसरी सर्वात मोठी मोबाइल फोन उत्पादक कंपनी बनू शकते. सध्या अॅप्पल इंक आणि सॅमसंग इंडिया त्यांचे मोबाइल फोन भारतात तयार करत आहेत.
नुकतेच, न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, गुगल दक्षिण चीनमधील पिक्सल ७ फोनचे अर्धे उत्पादन व्हिएतनाममध्ये हलवण्याची योजना आखत आहे. तथापि, नरेंद्र मोदी सरकार भारताचा असेंब्ली बेस म्हणून वापर करण्यासाठी गुगलसोबत प्राथमिक चर्चा करत आहे. आता पिचाई भारतात आल्यावर त्यांच्याशी चर्चा या दिशेने पुढे नेली जाईल, असे मानले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.