आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तवरुआ द्वीप:फिजीच्या बेटावर एका वर्षापासून लपून बसलेत गुगलचे सहसंस्थापक

न्यूयॉर्क3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना मदत कार्यासाठी फिजी सरकारला खासगी जेट विमान दिले

गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज सहसा झगमगाटापासून दूरच राहतात. कोरोना काळात गेल्या एका वर्षापासून फिजीच्या एका बेटावर ते राहत आहेत. ‘इनसाइडर’च्या रिपोर्टनुसार फिजीतील तवरुआ द्वीपावर पेज यांनी ठाण मांडले आहे. जूनमध्ये फिजीतील राष्ट्रीय प्रसारण सेवेने त्यांच्याबाबत वृत्त दिले. यात म्हटले की, कोरोना लस, मास्क, हातमोजे यासारख्या वस्तू आणण्यासाठी पेज यांनी आपले खासगी विमान उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या विमानाने उड्डाणेही केली आहेत.

गुगलने दखल घेताच हटवले वृत्त
या रिपोर्टनुसार फिजीतील आरोग्य अधिकाऱ्यांनी टीव्ही वाहिन्या आणि स्थानिक माध्यमांना पेज यांच्या रहिवासाशी निगडित बातम्या आणि छायाचित्रे हटवण्यास सांगितले होते. सूत्रांच्या मते गुगलने दखल घेतल्यानंतर ही बातमी हटवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...