आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुगल इंडियाने बुधवारी २०२० मध्ये भारतात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या शब्दांची एक यादी जारी केली. विशेष म्हणजे अवघे वर्षभर देशाला घाबरवून टाकणाऱ्या कोरोनापेक्षाही लोकांनी आयपीएलला सर्वाधिक सर्च केले. म्हणजेच ओव्हरऑल सर्चिंगमध्ये आयपीएल पहिल्या आणि काेराेना दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
टॉप ट्रेंडिंग सेलिब्रिटींत आगामी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी सर्वाधिक सर्च करण्यात आले. इतकेच नव्हे तर लोकांनी अमेरिका, बिहार आणि दिल्ली निवडणुकीबाबतही मोठ्या प्रमाणात सर्च केले. पीएम किसान योजना आणि चित्रपटांत ‘दिल बेचारा’ सर्वाधिक सर्च झाले. गुगल ग्लाेबल डेटानुसार, जगात सर्वाधिक सर्च कोरोनाबाबतच करण्यात आले. लाेकांनी घरातच पनीर तयार करण्याची पद्धत आणि जवळपासच्या फूड शेल्टर्सना इतके सर्च केले की ते टाॅप लिस्टमध्ये समाविष्ट झाले.
बातम्या व घडामोडींचा विचार करता भारतात लोकांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणूक, लॉकडाऊन, टोळधाड, बैरूत धमाका, ऑस्ट्रेलियातील वणव्याबाबत सर्वाधिक सर्च केले. सर्वाधिक सर्च होणाऱ्यांत कनिका कपूर ही बॉलीवूड गायिका तिसऱ्या स्थानी होती. अमिताभ बच्चन, कंगना रनाैत, रिया चक्रवर्ती व अंकिता लोखंडेलाही सर्च करण्यात आले. तसेच उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन, अमेरिकेच्या आगामी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस व अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशीद खानचाही यादीत समावेश आहे. चित्रपटांच्या सर्च लिस्टमध्ये सुशांतसिंह राजपूतचे नाव नाही. त्याचा ओटीटीवरील ‘दिल बेचारा’ चित्रपट सर्वाधिक सर्च झाला. यानंतर तामिळ अॅक्शनपट ‘सोरारई पोटरू’ सर्च झाला. बॉलीवूड बायोपिकमध्ये तान्हाजी, गुंजन सक्सेना, शकुंतला देवी सर्च झाली. वेब सिरीज सर्चमध्ये मनी हाइस्टनंतर स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी, मिर्झापूर-२ व बिग बॉस-१४ चा समावेश आहे. शब्दार्थांसाठी सीएए, एनआरसी आणि नेपोटिझमलाही सर्वाधिक सर्च करण्यात आले.
सर्च टर्म : फूड शेल्टर्स निअर मी व हाऊ टू मेक डालगाेना काॅफी
गुगलनुसार सर्वाधिक रंजक सर्च टर्म हाऊ टू, व्हाॅट इज व निअर मी हे आहेत. गुगलने म्हटले, या सर्च क्वेरी सांगतात की लोक कोरोनाकाळात हे सर्व सर्च करत आहेत. उदा. हाऊ टू मेक पनीर, हाऊ टू इन्क्रीज इम्युनिटी, हाऊ टू मेक डालगाेना काॅफी सर्वाधिक सर्च झाले. व्हाॅट इज काेराेना, व्हाॅट इझ बिनाेद, व्हाॅट इझ प्लाझ्मा थेरपी या सर्चिंग श्रेणीत टाॅपर होते. निअर मी सर्च श्रेणीत लाेकांनी फूड शेल्टर, काेराेना टेस्ट, क्रॅकर्स शाॅप, वाइन शाॅप व ग्राॅसरी स्टाेअरला जास्त सर्च केले आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या परिसरात लॅपटाॅप, ब्राॅडबँड कनेक्शन आणि जिम इक्विपमेंटचीही माहिती मागितली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.