आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अजून एका मोठ्या डीलची शक्यता:रिलायंस जिओमध्ये गूगल 30 हजार कोटींची गुंतवणूक करण्याच्या तयारीत, लवकरच होऊ शकते घोषणा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक कंपनी गूगल (Google) रिलायंस इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्म्स (jio platforms limited)मध्ये भागीदारी खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकन कंपनी गूगल 4 बिलियन डॉलर (30 हजार कोटी रुपये)ची गुंतवणूक करू शकते. येत्या काही दिवसात याबाबत घोषणा होऊ शकते. परंतू, याबाबत रिलायंस इंडस्ट्रीज आणि गूगलकडून अद्यात कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

जिओमधील दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक

जर गूगलने रिलायंस जिओमध्ये गुंतवणूक केली, तर कंपनीला मिळणारी ही 14वी आणि दुसरी सर्वात मोठी गुंतवणूक असेल. यापूर्वी फेसबुकने 43 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जिओमध्ये केली आहे.

रिलायंस इंडस्ट्रीजची बुधवारी एजीएम आहे. अशी शक्यता आहे की, चेअरमन मुकेश अंबानी एजीएममध्ये या डीलबाबत सांगू शकतात. रिलायंस इंडस्ट्रीजने एप्रिलपासून आतापर्यंत जिओमधील भागीदारी विकून आणि राइट्स इश्यूला मिळून 1.70 लाख कोटी रुपये मिळवले आहेत.

फेसबूकने सर्वात आधी जिओमध्ये गुंतवणूक केली होती

मागील 12 आठवड्यात रिलायंस जिओला 13 गुंतवणूक मिळाल्या आहेत. फेसबुकने 22 एप्रिलला सर्वात आधी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक केली होती. फेसबुकने जिओमध्ये 9.99 टक्के भागीदारी खरेदी करुन 43 हजार कोटी रुपये गुंतवले होते. यानंतर सिल्वर लेक, विस्टा इक्विटी, जनरल अटलांटिक, केकेआर, मुबाडलानेही जिओमध्ये गुंतणूक केली होती. नुकतंच अबू धाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटी (एडीएआई), टीपीजी, एल कॅटरटन, पीआईएफ आणि इंटेलनेही गुंतवणूकीची घोषणा केली आहे.

गूगल भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल

गूगलने सोमवारी भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक इक्विटी इनवेस्टमेंट, पार्टनरशिप आणि ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे केली जाईल. गूगल फॉर इंडिया इवेंटमध्ये कंपनीचे सीईओ सुंदर पिचाईने म्हटले की, भारताच्या डिजिटलीकरणशी संबंधित घोषणांबाबत कंपनी उत्साहित आहे.