आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Google Removes Hundreds Of Loans From App Store, Major Action For Non compliance

नवी दिल्ली:गुगलने शेकडो लोन अॅप प्ले स्टोअरमधून हटवले, सुरक्षा मानकांचे पालन न केल्याने मोठी कारवाई

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरक्षा मानकांचे पालन न करणारे शेकडो पर्सनल लोन अॅप गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहेत. गुगलने गुरुवारी ही कारवाई केली. गुगलने सांगितले की, आम्ही भारतात असलेल्या शेकडो पर्सनल लोन अॅपचा आढावा घेतला आहे.

या प्रक्रियेत ग्राहक सुरक्षा धोरणांचा उल्लंघन करणारे सर्व अॅप तत्काळ प्ले स्टोअरवरून हटवले आहेत. हजारो युजर्स व सरकारी संस्थांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, कोणकोणते अॅप हटवण्यात आले हे कंपनीने सांगितले नाही. कंपनीने गुरुवारी म्हटले की, ‘गुगलच्या उत्पादनांशी संबंधित सुरक्षित अनुभव प्रदान करण्यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.’

आरबीआयनेही एका कृती दलाची केली स्थापना
ऑनलाइन कर्ज देणारे प्लॅटफॉर्म आणि मोबाइल अॅपच्या घोटाळ्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही बुधवारी एका कृती दलाची स्थापना केली. हे दल डिजिटल कर्ज प्रक्रियेशी संबंधित नियमन उपायांबाबत सूचना करेल.

बातम्या आणखी आहेत...