आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोरखपूरमध्ये पत्नी आणि 2 मुलांची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेच्या फॉरेन्सिक तपासात धक्कादायक तथ्य समोर आले आहे. ही संपूर्ण घटना दारूच्या नशेत त्या व्यक्तीने केली आहे. रात्री उशिरा झालेल्या वादातून त्याने पत्नी आणि मुला-मुलीची गळा चिरून हत्या केली. काही वेळाने ते तिघे हालचाल करत नसल्याने तो घाबरला असावा. त्यानंतर त्याने तिघांच्या जखमांवर डेटॉल लावून मलमपट्टी केली. तो एवढा नशेत असावा की, त्याला कळले देखील नाही की, त्यांचा मृत्यू झाला की ते जीवंत आहे की नाही.
पहाटे जेव्हा पती शुद्धीवर आला असेल तेव्हा त्याला आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप झाला. त्यानंतर त्याने स्वत:वर रॉकेल ओतून पेटवून घेतले. असा अहवाल फॉरेन्सिक विभागाने दिला आहे. दरम्यान, नशेत तर्रर्र असलेल्या त्या व्यक्तीच्या घरातून जेव्हा धूर बाहेर येवू लागला. तेव्हा शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यानंतर तिहेरी हत्याकांड आणि आत्महत्येचे खळबळजनक प्रकरण समोर आहे.
सर्व प्रथम घटना काय आहे समजून घ्या
गोरखपूरमधील गोला येथील देवकाली गावात इंद्रबहादूर मौर्य (42) याने पत्नी सुशीला 38, मुलगी चांदणी- वय10, मुलगा आर्यन (8) यांची गळा चिरून हत्या केली. यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी तोडून घरात प्रवेश केला. खोलीतील बेडवर पत्नी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह पडले होते. तर खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात इंद्रबहादूर यांचा मृतदेह पडलेला होता. घरात ठेवलेला टीव्ही व फॉगिंग मशिन तोडले. सर्व सामान विखुरलेले होते, ज्यामुळे घटनेपूर्वी घरात पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते, असा अंदाज लागून येतो.
पत्नीवर चाकूने 4 वार केले, मुलांचा गळा चिरला
फॉरेन्सिकनुसार, इंद्रबहादूरने आपल्या पत्नीवर चाकूने 4 वार केले. त्याच्या छातीवर, मानेवर आणि पोटावर खुणा होत्या. याशिवाय पत्नीचे रक्तही भिंतींवर होते. म्हणजे बायकोशी खूप संघर्ष झाला. तर दोन्ही मुलांचे रक्त फक्त बेडवर आढळून आले. म्हणजेच गळा चिरून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जुगारात 50 हजार गमावले होते
मृत इंद्रबहादूरने गावात सुरू असलेल्या अवैध जुगारात 50 हजार गमावले होते. दुसरे त्या ठिकाणी काही सावकार लोक कर्ज देण्यासाठी त्या ठिकाणी येतात. जो व्यक्ती पैसा हरला त्याची गाडी, मोबाईल, शेत किंवा दागीने गहाण ठेवून घेतात. इंद्रबहादूरही शनिवारी जुगार अड्ड्यावर पोहोचला होता. कर्ज घेऊन त्याने जुगार खेळला आणि 50 हजार गमावले होते, असे पोलिस तपासात समोर आले आहे.
दोन्ही मुले इंग्रजी माध्यमात शीक्षण घेत होती
इंद्रबहादूर हा जुगारी होता. त्यांनी मुलांकडे लक्ष दिले नाही, पण पत्नी सुशीला यांना दोन्ही मुलांना चांगले शिक्षण देण्याची इच्छा होती. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला. वयाच्या 10 व्या वर्षी, चांदनीने पीजीएलएन अकादमी, गोपाळपूर येथे 4 व्या वर्गात शिक्षण घेतले. तर तिचा लहान भाऊ आर्यन इयत्ता पहिलीत शिकत होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.