आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरअँडडीला सुलभ बनवणार:वैद्यकीय उपकरण बाजारपेठ 3 वर्षांत चारपट वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट

नवी दिल्ली / पवन कुमार7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात वैद्यकीय उपकरणांची बाजारपेठ तीन वर्षांत एक लाख कोटी ते चार लाख कोटी रुपयांचे करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मेडिकल डिव्हाइसमध्ये ग्राहक उपयोगी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इम्प्लांट्स, सर्जिकल उपकरणांसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार देशात मेडिकल डिव्हाइसची बाजारपेठ वाढवण्यासाठी संशोधन व विकासासोबत कर प्रणालीला देखील सुलभ करण्याचा संकल्प आहे. त्यामुळे खासगी क्षेत्र त्यात सहभागी होऊ शकेल. खासगी क्षेत्राच्या भागीदारीविना उद्दिष्ट साध्य केले जाऊ शकत नाही. वैद्यकीय उपकरणे व संशोधन प्रकल्पात आयआयटी, सीएसआयआर, आयआयएससी, एम्स, कौशल्य विकास मंत्रालयाची मदत घेतली जाणार आहे. तज्ञ, तांत्रिक कर्मचाऱ्यांना कौशल्य विकास मंत्रालयाची मदत होणार आहे. मंत्रालय उद्योगात काम करणाऱ्या कुशल कारागिरांची फौज उभी करण्याचे काम करेल.

बातम्या आणखी आहेत...