आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Government Allows Import Of 17 Medical Devices Including Oxygen Concentrators And Ventilators For 3 Months Amid Covid Surge; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारचे महत्वपूर्ण निर्णय:केंद्र सरकारकडून 3 महिन्यांसाठी व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेटरसह 17 वैद्यकीय उपकरणाच्या आयातीला मंजुरी

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1 लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे आदेश

देशात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे डबघाईला आलेली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आरोग्य व्यवस्थेला बळ देण्यासाठी पुढील तीन महिन्यांकरीता व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेटरसह 17 वैद्यकीय उपकरणाला परवानगी दिली आहे. जेणेकरुन देशातील अत्यावश्यक सामग्रीचा तुटवडा भरुन निघणार असल्‍याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

सरकारने मंजुरी दिलेल्या उपकरणांमध्ये नेब्युलायझर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सीपीएपी यंत्रे, ऑक्सिजन कॅनिटर्स, ऑक्सिजन जनरेटर आणि व्हेंटिलेटर सारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. गोयल यांच्या मते, यामाध्यमातून कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठे बळ मिळणार असल्याचे ही ते म्हणाले.

1 लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे आदेश
केंद्र सरकारने पंतप्रधान केअर फंडमधून 1 लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि 500 ​​प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन (पीएसए) ऑक्सिजन संयंत्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पीएमओच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने 713 पीएसए प्रकल्पांचे ऑर्डर आधीच दिले आहेत. दरम्यान, बुधवारी 500 नवीन प्लांटचे ऑर्डर देण्यात आले आहे.

पुढील तीन महिन्यांत तयार होणार प्लांट
हे पीएसए प्रकल्प घरगुती उत्पादकतेतून तयार केले जाणार आहे. यासाठी या कंपन्यांना संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) विकसित केलेली तंत्रज्ञान नियुक्त केली जाईल. विशेष म्हणजे डीआरडीओकडून हे प्लांट येत्या तीन महिन्यांत देशात संपूर्ण देशात लावले जाईल.

बातम्या आणखी आहेत...