आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत आता अनलॉक 7 ची तयारी असून सरकारने तशी गाइडलाईन जारी केली आहे. यामध्ये ट्रेनिंग सेंटर 50 टक्के क्षमतेसह उघडण्याची परवानगी दिली आहे. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, शाळा-महाविद्यालयीन प्रशिक्षण, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, पोलिस व सैन्याच्या प्रशिक्षणासह इतर ट्रेनिंगसाठी परवानगी घेण्याची गरज भासणार नाहीये. याशिवाय शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत मेळाव्यास परवानगी देखील देण्यात आली आहे. परंतु, शाळा महाविद्यालय आणि मल्टीप्लेक्सवर अद्याप सरकारने बंदी घातलेली आहे.
अनलॉक 6 मध्ये स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सना सूट
गेल्या रविवारी दिल्ली सरकारने प्रेक्षकविना स्टेडियम आणि क्रीडा संकुल उघडण्यास मान्यता दिली होती. तथापि, सिनेमा घरे, थिएटर, मल्टिप्लेक्स, बॅनक्वेट हॉल, सभागृह आणि शाळा व महाविद्यालये उघडण्यावर अद्याप निर्बंध कायम आहेत. यासह सामाजिक/राजकीय मेळाव्यांनाही दिल्ली सरकारने बंदी घातलेली आहे.
दिल्लीत आता या गोष्टींना सूट
1. योग केंद्रे आणि जिम 50 टक्के क्षमतेसह सुरु करण्यात येईल.
2. लग्न समारंभात 50 लोक उपस्थित राहू शकतील.
3. सरकारी कार्यालय, स्वायत्त संस्था, पीएसयू आणि महामंडळे 100 टक्के कर्मचाऱ्यांसह उघडले जातील.
4. खाजगी कार्यालय सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत 50 टक्के कर्मचाऱ्यांसह उघडतील.
5. दुकाने, रेजिडेंस कॉम्प्लेक्स, रेशन दुकान सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत उघडे राहतील.
6. परवानगी असलेल्या साप्ताहिक बाजारपेठा 50 टक्के क्षमतेसह उघडली जाऊ शकतात.
7. स्टेडियम व क्रीडा संकुल, प्रशिक्षण केंद्र.
यावर अद्यापही बंदी
1. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था.
2. सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम
3. जलतरण तलाव, सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.